जीवनज्योत सिंग तेजा(फोटो-सोशल मीडिया)
कोलकाता : देशाच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाला व्हिसाच्या विलंबामुळे अमेरिकेत झालेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक स्टेज १ स्पर्धेत खेळता आले नाही, ज्यामुळे संघाला पदकांपासून वंचित राहावे लागले असे मत भारतीय प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांनी वर्तविले. २०२४ मध्ये जगातील अव्वल क्रमांकाच्या भारतीय महिला कंपाउंड संघाने तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती. त्यांच्या तीन सदस्यांना-विश्वविजेती अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर आणि तनिपार्थी चिकिथा यांना वेळेवर अमेरिकेचे व्हिसा मिळाले नाहीत. ज्यामुळे ते फ्लोरिडातील ऑर्बरन्डेल येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेऊ शकले नाहीत. तसेच तेजा स्वतः अमेरिकेला जाऊ शकले नाही. आमच्या महिला संघाला ही स्पर्धा जिंकण्याची १०० टक्के संधी होती.
गेल्या वर्षी शांघाय, येचियोन आणि अंताल्या येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आम्ही तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती. परंतु, दुर्दैवाने व्हिसाच्या विलंबामुळे आम्हाला यावेळी आमचे जेतेपद राखून् ठेवण्यास शक्य झाले नाही. हरविंदर सिंगला २०२१ मध्ये टोकियो येथे भारताचे पहिले पॅरालिम्पिक तिरंदाजी पदक (कांस्य) जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदरने ऐतिहासिक सुवर्णपदक सुवण जिंकले तेव्हाही तो तिथे उपस्थित होता. भारतीय तिरंदाजी संघटनेने (एएआय) तीन महिन्यांपूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. आमच्याकडून तीन महिन्यांपूर्वी निवड चाचण्या घेण्यात आल्या आणि संघाची घोषणा झाल्यानंतर लगेचच अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज केला करण्यात आला. आम्हाला ‘अनुशेष’ बद्दल माहिती होती. अमेरिकन दूतावास आणि नंतर क्रीडा मंत्रालयाच्या प्रयत्नांनंतर देखील, व्हिसा ८ एप्रिल रोजीच जारी करण्यात आला, तोपर्यंत कंपाऊंड स्पर्धा सुरू देखील झाली होती.
हेही वाचा : DC Vs RCB: केएल राहुलच्या वादळी खेळीने दिल्लीचा दबंग विजय; आरसीबीचा 6 विकेट्सनी पराभव
परंतु व्हिसाला वारंवार विलंब झाल्यानंतर, केवळ १४ सदस्यांना व्हिसा मंजूर करण्यात आला. याबबात एएआयने इंस्टाग्रामवर एक आवाहन देखील प्रसिद्ध केले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेप केल्यामुळे व्हिसा मिळाला. तथापि, नऊ पैकी दोघांना व्हिसा नाकारण्यात आला होता. तर तीन महिला कंपाउंड धनुर्धार्यासह इतर सात जणांना स्पर्धा सुरू झाल्याच्या दिवशी म्हणजे आठ एप्रिल रोजी व्हिसा मंजूर करण्यात आला. स्पर्धा सुरू झाल्यानंतर तीन कंपाउंड धनुर्धारी पाठवण्यात काही एक अर्थ उरला नव्हता. आम्हाला त्यांची तिकिटे रद्द करावी असे एएआयच्या सहाय्यक सचिव गुंजन अब्रोल यांच्याकडून सांगण्यात आले.
Huge disappointment! Players missed out on US competition, medals too due to visa unavailability; Jeevanjyot Singh Teja expresses regret