
IND VS ZIM
भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी संध्याकाळीच रायपूरमध्ये दाखल झाला आहे. संघाची धुरा सांभाळणारी कर्णधार स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून मैदानात उतरणार आहे. झिम्बाब्वेचा आज दिवसभरात रायपुरमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायपूरमध्ये आगमन झाल्यानंतर दोन्ही संघ टी 20 सिरिजआधी सराव करताना पाहायला मिळू शकतात.
IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
मालिकेचे सविस्तर वेळापत्रक:
या सिरिजमध्ये तीन 20 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहेत. अवघ्या सहा दिवसांत एकापाठोपाठ एक तीन सामने होत असल्याने रायपूरसह संपूर्ण परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे यांच्यातील आगामी टी-२० आणि वनडे सिरिजचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या दौऱ्याची सुरूवात 16 ऑक्टोबरपासून टी 20 सिरिजने होणार आहे.
भारतीय संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतिमणी कलिता आणि मिन्नू मणी.
IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर
झिम्बाब्वेचा संघ; जोसेफिन न्कोमो (कर्णधार), बिलेव्ड बिज़ा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस न्धलोवु, मिशेल मावुंगा, फ्रांसिस्का चिपारे, ओलिंडर चारे, कुदजाई चिगोरा, न्याशा ग्वांजुरा, नोमवेलो सिबांडा, लॉरिन फिरी, चियेड्जा धुरुरु, मोडेस्टर मुपाचिकवा, टेंदाई माकुशा आणि शार्ने मेयर्स.