फोटो सौजन्य - surya_14kumar/ एकनाथ शिंदे X अकाउंट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार चॅम्पियन्सचा सत्कार : भारताच्या संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला. भारताच्या संघाने तब्बल १७ वर्षानंतर टी २० वर्ल्डकप जिंकला आहे. यानिमित्ताने भारतीय खेळाडूंचे जगभरामध्ये स्वागत केले जात आहे. भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वविजेता झाला. दिल्लीमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी काही आनंदाचे क्षण भारतीय क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले. देशातील विश्वविजेत्या खेळाडूंचा सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आता लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या खेळाडूंचा सत्कार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तब्बल १७ वर्षांनी भारताने टी २० वर्ल्डकप जिंकला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुद्धा खेळाडूंचे स्वागत करण्यात येणार आहे. विधानसभेत आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबईकर खेळाडूंच्या स्वागताचा प्रस्ताव मांडला. या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या चौघांचा समावेश आहे. हे चारही खेळाडू मुंबईकर असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे पहिल्यादांचा थेट विधानभवनात सीएम शिंदेंच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार होणार आहे, असा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चारही खेळाडूंचा सत्कार लवकरच होणार आहे.
मुंबईमध्ये आज बीसीसीआयने चॅम्पियन खेळाडूंसाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १७ वर्षानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा रोडशो होणार आहे. याआधी भारताच्या संघाने २००७ मध्ये विश्वकप जिंकला होता. त्यावेळी रोडशोचे आयोजन करण्यात आले होते. आता भारतातील क्रिकेट चाहते रोड शो साठी सज्ज झाले आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आज सकाळपासून मुंबईमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. हा रोड शो नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी खास बसचे आयोजन करण्यात आले आहे.