Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus: पालघर जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; 2 वर्षात 200 एसटी बसेस मिळणार

पालघर जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षांत एकूण 200 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 05, 2026 | 06:39 PM
पालघर जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; 2 वर्षात 200 एसटी बसेस मिळणार

पालघर जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; 2 वर्षात 200 एसटी बसेस मिळणार

Follow Us
Follow Us:

मुंबई : पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षांत एकूण 200 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.

दरम्यान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील विविध एसटी आगारांमध्ये मनुष्यबळ व बसेस मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन या विषयावर तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने 05 मार्च 2026 रोजी विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने 200 नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या निर्णयानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षात 90 बसेस आणि सन 2027 – 28 या आर्थिक वर्षात 110 बसेस देण्यात येणार आहेत. तसेच या बसेस जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये पालघर आगारासाठी 10, सफाळे 10, वसई 15, अर्नाळा 15, डहाणू 05, जव्हार 15, बोईसर 10 आणि नालासोपारा 10 बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय विभागीय कार्यशाळा व संबंधित आगारांमधील रिक्त पदे येत्या 03 महिन्यांच्या आत पूर्ण क्षमतेने भरण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

यावेळी आमदार विलास तरे यांनी 21 फेब्रुवारी 2026 रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या “परीक्षेसाठी पिकअप वाहनातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास” या बातम्यांकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मानव विकास मिशन अंतर्गत ‘गाव ते शाळा’ ही मोफत बस सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘गाव ते शाळा’ मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Web Title: 200 st buses will be provided to the people of palghar in 2 years mla vilas tarec

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी
1

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार
2

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
3

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.