Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivneri ST Bus : एसटीची ‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Shivneri ST Bus News: एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2026 | 03:13 PM
एसटीची ‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

एसटीची ‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Follow Us
Follow Us:

Shivneri ST Bus News in Marathi : मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

२००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

२०० अत्याधुनिक व्होल्व्हो बसांची खरेदी

राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होईल.

प्रस्तावित मार्गांमध्ये

नाशिक–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर, नागपूर–अमरावती–अकोला अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

ई-बस सेवेलाही उत्तम प्रतिसाद

सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरीवली–स्वारगेट, बोरीवली–शिवाजीनगर, ठाणे–स्वारगेट आणि ठाणे–शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बस सेवा सुरू असून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ज्येष्ठ व महिलांसाठी सवलती

महिला प्रवाशांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

३० ‘स्लिपर शिवनेरी’ची भर

नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे. ‘शिवनेरी’चा हा विस्तार म्हणजे केवळ बससेवेची वाढ नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवाससंस्कृतीची नवी दिशा आहे.असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Web Title: St shivneri now extends beyond mumbai pune announcement by transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
1

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश
2

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

ST Bus Smart Card: आधी कार्ड काढा, मग पैसे भरा अन् सवलत मिळवा! STच्या स्मार्ट कार्ड नियमांमुळे ग्रामीण प्रवाशांची खरी कसोटी
3

ST Bus Smart Card: आधी कार्ड काढा, मग पैसे भरा अन् सवलत मिळवा! STच्या स्मार्ट कार्ड नियमांमुळे ग्रामीण प्रवाशांची खरी कसोटी

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र
4

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.