Wow! IPL has become a money mine; BCCI has earned 'so many' crores of rupees this year
IPL 2023-24 : भारतातच नाही तर जगभरात इंडियन प्रीमियर लीगचे आकर्षण राहिले आहे. जगातील प्रसिद्ध लीग पैकी एक असणारी आयपीएल हि आता केवळ क्रिकेट स्पर्धा राहिलेली असून ती बीसीसीआयसाठी उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत बनल्याचे दिसुन येत आहे. आयपीएलने २०२३-२४ या आर्थिक वर्षात बीसीसीआयच्या एकूण उत्पन्नात सुमारे ५९ टक्के भरणा केली आहे. बीसीसीआयने आयपीएलमधून ५७६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
द हिंदू बिझनेस लाईन ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात बीसीसीआयने एकूण ९,७४१.७ कोटी रुपये कमावले आहेत. यापैकी ५,७६१ कोटी रुपये फक्त आयपीएलमधून मिळाले असल्याचे म्हटले आहे. यावरून हे दिसून येते की ही स्पर्धा आता बीसीसीआयच्या आर्थिक रचनेचा एक महतवाचा आधारस्तंभ बनली आहे.
हेही वाचा :
आयपीएल २००८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेला वर्षानुवर्षे लोकप्रियता मिळत आहे. व्यवसाय रणनीतिकार लॉयड मॅथियास यांनी म्हटले आहे की, २००८ मध्ये बीसीसीआयने आयपीएल सुरू करताना त्यांना “गोल्डन हेन” मिळाला आहे. मॅथियास म्हणाले की ही केवळ सर्वात यशस्वी टी२० लीग नसून ती देशांतर्गत खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी देखील उपलब्ध करून देते. याशिवाय, मीडिया हक्कांमधून देखील मिळणारे उत्पन्न सतत वाढत असल्याचे दिसत आहे.
बीसीसीआयला आंतरराष्ट्रीय सामने आणि रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी इत्यादी इतर देशांतर्गत स्पर्धांच्या प्रसारणातून देखील काही महसूल मिळत असतो. परंतु तो आयपीएलच्या तुलनेत बघता खूपच कमी असलयाचे दिसून येत आहे. अहवालानुसार, बीसीसीआयने या बिगर-आयपीएल मालमत्तांमधून फक्त ३६१ कोटी रुपयेच कमावले आहेत. रेडिफ्यूजनचे प्रमुख संदीप गोयल यांचे म्हणणे आहे की, बीसीसीआय अजून देखील त्याच्या पूर्ण कमाईच्या क्षमतेपर्यंत पोहचू शकलेले नाही. त्यांच्या मते, रणजी ट्रॉफी, सीके नायडू ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी सारख्या पारंपारिक देशांतर्गत स्पर्धांचे व्यावसायिकीकरण करून मोठे पैसे कमवता येऊ शकतात.
हेही वाचा :
अहवालात असे देखील म्हटले गेले आहे की, बीसीसीआयकडे सुमारे ₹३०,००० कोटींचा राखीव निधी असून त्यावर दरवर्षी सुमारे ₹१,००० कोटी रुपयांचे व्याज मिळते. याशिवाय, प्रायोजक, मीडिया डील आणि सामन्याच्या दिवसाच्या कमाईमुळे दरवर्षी सुमारे १०-१२ टक्के वाढ होत असल्याचे दिसून येते. त्याच वेळी, आयसीसी ही क्रिकेट संघटना देखील निधीसाठी बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कारण इतर क्रिकेट बोर्ड भारतीय बोर्डासमोर कमाईच्याबाबत खूप मागे आहेत.