
फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मिडिया
WPL 2026 Orange and Purple Cap Updated List – महिला प्रिमियर लीग 2026 ची दमदार सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आरसीबी आणि एमआयने कमालीची कामगिरी केली. दोन्ही संघामध्ये थ्रीलर सामना पाहायला मिळाला. तर काल मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्लीविरुद्ध 2026 चा पहिला विजय नावावर केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला प्रीमियर लीग २०२६ च्या तिसऱ्या सामन्यानंतर, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे बदल झाले आहेत.
MI ची कर्णधार हरमनप्रीत कौरने डीसी विरुद्ध ७४ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली आणि WPL २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. हरमनप्रीत कौर आरसीबी विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकली नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात तिने ती भरून काढली. दरम्यान, पर्पल कॅपच्या शर्यतीत जवळची स्पर्धा सुरू आहे. हरमनप्रीत कौरने WPL २०२६ मध्ये दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत, तिचा स्ट्राइक रेट १५९.३२ आहे, ९४ आहे.
दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशची फोबी लिचफिल्ड आहे, जिने गुजरात जायंट्सविरुद्ध ७८ धावा केल्या, जरी तिचा संघ जिंकू शकला नाही. WPL २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांच्या यादीत नॅट सायव्हर-ब्रंट, अॅशले गार्डनर आणि नॅडिन डी क्लार्क यांचाही समावेश आहे.