
फोटो सौजन्य - Women's Premier League (WPL)
WPL 2026 Updated Points Table – महिला प्रीमियर लीगच्या या नव्या सिझनमध्ये क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होत आहे. सोशल मिडियावर सध्या या सामन्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. महिला प्रीमियर लीग 2026 चे हे सामने हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहे. काल गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. सोफी डेव्हाईनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे, गुजरात जायंट्सने महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला.
या विजयासह, गुजरात जायंट्सने WPL पॉइंट्स टेबलवरही वर्चस्व गाजवले आहे. त्यांनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. WPL इतिहासात गुजरात जायंट्सने हंगामातील त्यांचे पहिले दोन सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे पहिले दोन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्यानंतर अपडेटेड पॉइंट्स टेबलवर एक नजर टाकूया.
अॅशले गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा आणि दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २०० धावांचा टप्पा ओलांडला. गुजरात जायंट्सचे आता दोन सामन्यांत चार गुण झाले आहेत आणि ते अव्वल स्थानावर पोहोचले आहेत.
A blockbuster Sunday at the #TATAWPL 🍿 Describe this match in 1⃣ word 👇 Relive the thrilling encounter ▶️ https://t.co/RQX2e3THqc #KhelEmotionKa | #DCvGG pic.twitter.com/DGOuZrz7Dg — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 11, 2026
दरम्यान, गुजरातच्या विजयामुळे मुंबईला धक्का बसला आहे, ज्यामुळे हरमनप्रीत कौरची एमआय दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईने हंगामातील आपला पहिला सामना आरसीबीविरुद्ध गमावला होता, परंतु दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून त्यांनी आपले खाते उघडण्यात यश मिळवले. मुंबई इंडियन्सप्रमाणे, आरसीबीच्या खात्यातही २ गुण आहेत, परंतु खराब नेट रन रेटमुळे, एमआय दुसऱ्या स्थानावर आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. WPL २०२६ पॉइंट्स टेबलमध्ये यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने अद्याप आपले खाते उघडलेले नाही.
| संघ | सामना | विजय | पराभव | निकाल लागला नाही | गुण | रन रेट |
|---|---|---|---|---|---|---|
| गुजरात जायंट्स | 2 | 2 | 1 | 0 | 4 | +0.350 |
| मुंबई इंडियन्स | 2 | 1 | 1 | 0 | 2 | +1.175 |
| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | 1 | 1 | 1 | 0 | 2 | +0.150 |
| यूपी वॉरियर्स | 1 | 0 | 1 | 0 | 0 | -0.500 |
| दिल्ली कॅपिटल्स | 2 | 0 | 2 | 0 | 0 | -1.350 |
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सने निर्धारित २० षटकांत २०९ धावा केल्या. सोफी डेव्हिन शतक हुकली तर कर्णधार अॅशले गार्डनर अर्धशतक हुकले. सोफीने ९५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि गार्डनरने ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दिल्लीकडून नंदनी शर्माने हॅटट्रिक घेतली आणि एकूण ५ बळी घेतले. २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सकडून लिझेल लीने ८६ धावांची आणि लॉरा वोल्वाड्टने ७७ धावांची शानदार खेळी केली, परंतु तरीही त्या दोघांनाही त्यांच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. दिल्लीला शेवटच्या षटकात ७ धावा करता आल्या नाहीत.