Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

WPL 2027 : मुंबई इंडियन्सने आगामी डब्ल्यूपीएलसाठी ल्यूक विलियम्स यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लावली आहे. त्यांच्याकडे डब्ल्यूपीएलमधील प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 24, 2026 | 02:23 PM
WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • डब्ल्यूपीएलमध्ये ल्यूक यांचा दांडगा अनुभव
  • आरसीबीला मिळवून दिलंय जेतेपद
  • मुंबई इंडियन्सला त्यांच्याकडून अफाट अपेक्षा
 

दोन वेळचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स (एमआय)ने 2027 व्युमन्स प्रीमियर लीग (WPL 2027) च्या आगामी हंगामाआधी ल्यूक विलियम्स यांना आपल्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्त केले. विलियम्स हेड कोचच्या रुपात लिसा केटली यांची जागा घेतील. विलियम्स यांनी 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ला डब्ल्यूपीएलचे पहिले जेतेपद पटकावून दिले होते.

स्वतः विलियम्स यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, मी मुंबई इंडियन्स, जी एक प्रतिष्ठीत व यशस्वी फ्रँचायजी आहे, त्यात सहभागी होण्यासह खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या या प्रतिभावंत ग्रुपसोबत काम करण्यास उत्साहित आहे. आमच्याकडे एकत्रितपणे एक रोमहर्षक क्रिकेट खेळणे आणि यश मिळवण्याची एक शानदार संधी आहे. मी या आव्हानाची वाट पाहत आहे. आपल्या चाहत्यांना अभिमान वाटावे असे क्षण देण्याची माझी इच्छा आहे.

नीता अंबानींने केले स्वागत

एमआयच्या ओनर नीता अंबानी याबाबत म्हणाल्या की, आम्ही मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात ल्यूक विलियम्स यांचे स्वागत करत आहोत. ल्यूक एक विजेते असून त्यांच्याकडे अफाट अनुभव आहे. महिलांच्या खेळाबाबतचा सखोल विचार आणि खेळाडूंना विकसित करण्याची एक बळकट वचनबद्धता घेऊन ते संघात आलेत. मी ल्यूक आणि संपूर्ण संघाला या रोमहर्षक नव्या अध्यायासाठी शुभेच्छा देते.
त्या पुढे म्हणाल्या की, आमच्या मुलींनी डब्ल्यूपीएलमध्ये एक शानदार वारसा निर्माण केला आहे. मला विश्वास आहे की, ल्यूक यांचे मार्गदर्शन आणि हरमनच्या नेतृत्त्वात आम्ही पुढे जाऊ व यश संपादन करू.

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

विलियम्स समोर अनेक आव्हानं

सर्व काही सोप्पे वाटत असले तरी विलियम्स यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. त्यांना सर्वात आधी येणाऱ्या हंगामाआधी एमआयमधील प्लेयर रिटेंशन आणि ऑक्शनची रणनीति आखावी लागेल. डब्ल्यूपीएलचा पाचवा हंगामाच्या प्लेअर रिटेंशनची अखेरची तारीख 28 सप्टेंबर आहे. तर लिलाव 28 ऑक्टोबरला कोच्चीत होईल.
बीसीसीआयने केलेल्या एका वक्यव्यानुसार, ही स्पर्धा 14 जानेवारी ते फेब्रुवारी 2027 पर्यंत खेळवले जाईल, तर या पाच संघाच्या मोठ्या स्पर्धेच्या यजमान शहरांचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Web Title: Wpl 2027 luke williams mumbai indians head coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • mumbai indians
  • WPL

संबंधित बातम्या

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
1

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
2

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.