
Mumbai Indians : ...मग हार्दिक पंड्याने कर्णधारपद सोडावे, अंबाती रायडूचा महत्त्वाचा सल्ला
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि मुंबई इंडियन्सकडून आयपीएल (IPL) मध्ये खेळलेला अंबाती रायुडू याने हार्दिकला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हार्दिकने भविष्यात मुंबई इंडियन्ससोबत राहण्याचा निर्णय घेतल्यास त्याने संघाचे कर्णधारपद सोडावे आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असे मत रायुडूने व्यक्त केले आहे.
क्रिकेटविषयक एका कार्यक्रमात बोलताना रायुडूने हार्दिकच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. तो म्हणाला, हार्दिक मुंबईत येऊन अडकला आहे, असे मला वाटते. एखाद्या ठिकाणी आपण अडकलो आहोत, अशी भावना निर्माण झाली की सतत मागे वळून पाहण्याची वेळ येते. ड्रेसिंग रूममध्ये असे वातावरण निर्माण झाल्यास खेळाडूंकडून नको त्या गोष्टी घडू शकतात. हार्दिकच्या बाबतीत अनेक गोष्टी योग्य पद्धतीने घडल्या नाहीत. त्यात त्याची चूक असू शकते किंवा इतरही काही कारणे असू शकतात.
Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय
रायुडूच्या मते, हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये कायम राहिला तर संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्याचा विचार करावा. हार्दिकला पूर्णपणे सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत खेळू द्यावे.
रायुडू पुढे म्हणाला, मुंबई इंडियन्समध्ये राहिल्यास हार्दिकने कर्णधार असू नये. त्याने फक्त स्वतःचा खेळ खेळावा, क्रिकेटचा आनंद घ्यावा आणि मुंबईसाठी सामने जिंकणारा खेळाडू बनावे. त्याने संघ सोडला तरी लगेच कर्णधारपदाचा विचार करू नये. किमान एका हंगामासाठी तरी त्याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारू नये.
भाई इस बार करना पडेगा! NZ च्या भूमीत Rohit Sharma च्या बॅटचा रेकॉर्ड थंडगार; या सिरीजमध्ये…
हार्दिकने मुंबई इंडियन्स सोडल्यास पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये त्याला चांगले वातावरण मिळू शकते, असेही रायुडूने म्हटले. याशिवाय कोलकाता नाइट रायडर्सकडेही हार्दिकसाठी अनेक संधी असू शकतात. कोलकाता संघाला नव्या कर्णधाराची गरज असल्याने हार्दिकच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे संकेतही रायुडूने दिले.
दरम्यान, आयपीएल 2027 पूर्वी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच्या संभाव्य ट्रेडबाबत क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले असून, मुंबई इंडियन्स आणि हार्दिक यांच्यातील पुढील निर्णयाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Ans: हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये कायम राहायचे असल्यास कर्णधारपद सोडून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला रायुडूने दिला आहे.
Ans: हार्दिकने सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत खेळावे, असे रायुडूचे मत आहे.
Ans: रायुडूने पंजाब किंग्ज, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांचा उल्लेख केला आहे.