
mumbai indians
आयपीएल 2027 च्या आधी एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. मागील हंगामातील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेत आपल्या संपूर्ण कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. विद्यमान कर्णधार हार्दिक पांड्या हादेखील संघातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे ह 2027 आधी मुंबई इंडियन्सचा संघ मोठे फेरबदल करत असल्याचे दिसून येत आहे.
सुरू असलेल्या चर्चा आणि माहितीनुसार, मुंबई इंडियंस व्यवस्थापन आगामी हंगामासाठी कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. व्यवस्थापन पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला करू शकते. तसेच नवीन खेळाडू म्हणून तिलक वर्माला संधी दिली जाऊ शकते. मागील काही काळापासून मुंबई इंडियंसच्या गोटात सुरू असलेल्या घडामोडी पाहता, आगामी २०२७ चा हंगामाची जोरदार तयारी मुंबई इंडियन्सने सुरू केल्याचे दिसून येत आहे.
आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटात कर्णधारपदावरून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्या याच्यासाठी मुंबई इंडियन्सने सध्या तरी कोणत्याही अधिकृत ‘ट्रेड ऑफर’ची पुष्टी केलेली नाही. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला किंवा त्याने कर्णधारपद सोडले, तर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा संघाची सूत्रे अनुभवी रोहित शर्मा यांच्याकडे सोपवते की युवा खेळाडू तिलक वर्मा याच्यावर विश्वास दाखवू शकते. त्यामुळे येत्या काळात मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन कोणता निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
Ans: रोहित शर्मा किंवा तिलक वर्मा मुंबईचा नवा कर्णधार होऊ शकतो.
Ans: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा विद्यमान कर्णधार आहे.