Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC 2025 Final : अंतिम सामन्यात Mitchell Starc सह Josh Hazlewood चा कहर! ५० वर्षांच्या विक्रमाला टाकले मागे..  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी एक विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 13, 2025 | 09:20 PM
WTC 2025 Final: Josh Hazlewood wreaks havoc with Mitchell Starc in the final match! Breaking a 50-year-old record..

WTC 2025 Final: Josh Hazlewood wreaks havoc with Mitchell Starc in the final match! Breaking a 50-year-old record..

Follow Us
Close
Follow Us:

WTC 2025 Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना चांगलाच रंगदार होत आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २८१ धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचे योगदान मोठे राहिले आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाल मोठी आघाडी मिळवून दिली आहे. जोश हेझलवूड आणि स्टार्क दोघांनीही शेवटच्या विकेटसाठी १३६ चेंडूंचा सामना करत शेवटच्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा : MCL 2025 : युनिव्हर्स बॉसचा विक्रम खालसा! टी-२० सामन्यात षटकारांचा आता ‘हा’ आहे नवीन ‘किंग’; पहा Video

तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २०७ धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या सुरुवातीलाच त्यांची ९ वी विकेट गमावली. त्यानंतर संघाचा स्कोअर १४८ धावांचा असताना मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने शानदार खेळी साकारली.  १० व्या विकेटसाठी या दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. या खेळीसह या दोन्ही खेळाडूंनी ५० वर्षे जुना असलेला एक खास विक्रम देखील  मोडीत काढला आहे.

१० व्या विकेटसाठी रचली सर्वात मोठी भागीदारी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात मिशेल स्टार्क आणि जोश हेडलवूड यांनी ५९ धावांची भागीदारी रचून एक नवीन विक्रम केला आहे. स्टार्क आणि जोश हेडलवूड या दोन्ही खेळाडूंनी आयसीसीच्या अंतिम सामन्यात १० व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचून विक्रम केला आहे. यापूर्वी १९७५ मध्ये डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांनी एकदिवसीय विश्वचषकात हा पराक्रम केला होता. या दोन्ही कॅरिबियन खेळाडूंनी शेवटच्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली होती.

Mitchell Starc and Josh Hazlewood have put on the highest 10th-wicket partnership in any men’s ICC final 💪 pic.twitter.com/bmtwFSFgp1

— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 13, 2025

दक्षिण आफ्रिकेला इतिहास रचण्याची संधी

कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने २८२ धावांचा स्कोअर उभा केला आहे. लॉर्ड्सच्या मैदानाचा इतिहास बघता लक्षात येते की,  २८० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना फक्त दोन वेळा विजय मिळवता आला आहे. इंग्लंडच्या संघाने  शेवटचा हा पराक्रम २००४ मध्ये रचला होता. त्याच वेळी, १९८४ मध्ये, वेस्ट इंडिजने या मैदानावर ३४२ धावा करून इतिहास नोंदवला होता. हा दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक विजय ठरला होता.

हेही वाचा : IND Vs END : ‘टीम इंडियाची तयारी, पण आम्ही सज्ज..’, इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकांनी भरला हुंकार!

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.

 

Web Title: Wtc 2025 final josh hazlewood breaks 50 year old record with mitchell starc in final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Josh Hazlewood
  • Mitchell Starc

संबंधित बातम्या

ICC TEST RANKING :  कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच गोलंदाज टॉप 10 मध्ये…
1

ICC TEST RANKING : कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच गोलंदाज टॉप 10 मध्ये…

कसोटी क्रिकेटमध्ये 400+ विकेट्स घेणाऱ्या क्लबमध्ये सामील झाला मिचेल स्टार्क! वाचा टाॅप 5 गोलंदाज
2

कसोटी क्रिकेटमध्ये 400+ विकेट्स घेणाऱ्या क्लबमध्ये सामील झाला मिचेल स्टार्क! वाचा टाॅप 5 गोलंदाज

Aus vs WI : मिचेल स्टार्कचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा कारनामा: दिग्गज ग्लेन मॅकग्ग्राच्या पंक्तीत झाला सामील..
3

Aus vs WI : मिचेल स्टार्कचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा कारनामा: दिग्गज ग्लेन मॅकग्ग्राच्या पंक्तीत झाला सामील..

WTC 2025 Final : ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने रडवले; कांगारू मजबूत स्थितीत, साऊथ आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांची गरज.. 
4

WTC 2025 Final : ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने रडवले; कांगारू मजबूत स्थितीत, साऊथ आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांची गरज.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.