फोटो सौजन्य – X
भारताचा संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, टीम इंडीयाने या सिरीजमध्ये आतापर्यत एक सामना जिंकला आहे, तर दोन सामने इंग्लडच्या संघाने जिंकले आहेत. क्रिकेट हा जागतिक खेळ नसला तरी त्याने काही खेळाडूंना जगभर प्रसिद्धी दिली आहे. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहलीसारखे लोकप्रिय खेळाडू हे भारताची देणगी आहेत. या तिन्ही खेळाडूंनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. हेच कारण आहे की त्यांची कमाई केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही. ते ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील खूप कमाई करतात. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी इंग्लिश क्रिकेटपटूंशी झालेल्या संभाषणात काही खेळाडूंच्या कमाईचा खुलासा केला.
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी शास्त्रींना थेट प्रश्न विचारला – काही भारतीय खेळाडू किती कमावतात? शास्त्रींच्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला. माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ‘ते खूप कमावतात. ते निश्चितच जाहिरातींद्वारे खूप कमावतात आणि हा आकडा १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.’ १०० कोटी म्हणजे किती असे विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘तुम्ही १० दशलक्ष पौंड म्हणू शकता.’ एका खेळाडूने उत्तर दिले – ‘वाह!’
IND vs ENG: आर. अश्विन गौतम गंभीरवर संतापला! या खेळाडूला वगळण्यावर प्रश्नचिन्ह केले उपस्थित
शास्त्री पुढे म्हणतात, ‘हो, १० दशलक्ष पौंड, मी शंभर रुपये एक पौंड म्हणून मोजत आहे. याचे कारण असेही आहे की तुम्ही काम करत रहा आणि त्यामुळे तुम्ही पुढे जात राहता.’ शास्त्री यांनी असेही उघड केले की एमएस धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर त्यांच्या उत्तम काळात अधिक जाहिराती करू शकले असते परंतु त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना तारखा शोधण्यात अडचण येत होती.
रवी शास्त्री म्हणाले, ‘जेव्हा एमएस धोनी, विराट किंवा सचिन त्यांच्या उत्तम वयात होते, तेव्हा ते १५-२० जाहिराती करायचे. त्यांना दररोज पैसे मिळायचे. तेव्हा त्यांच्याकडे वेळेची कमतरता होती. जितक्या प्रमाणात क्रिकेट खेळले जात होते, त्यात जाहिराती शूट करणे कठीण होते. त्यामुळे त्यांना जो काही वेळ मिळायचा, तो ते शूटिंगचा आनंद घेत असत.’
विराट कोहलीने आता कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. भारताच्या संघाविरुद्ध झालेल्या बाॅर्डर गावस्कर ट्रॅाफीनंतर तो संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. तर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून फार आधीच निवृती घेतली आहे सध्या तो आयपीएल खेळताना दिसतो.