
Image
Yuvraj Disale awarded: क्रीडाक्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय आणि मोलाच्या कार्याची दखल घेत ‘शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘शरद क्रीडा गौरव पुरस्कार – २०२६’ युवराज दिसले यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित विशेष सोहळ्यात हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना युवराज दिसले म्हणाले, “सातत्याने क्रीडाक्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत मला हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारामुळे आजवरच्या प्रवासातील मेहनतीला नवी ऊर्जा मिळाली असून, यापुढे अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि माझ्या कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हे यश आहे.”
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची प्रेरणा आणि आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनातून समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना मिळणारा हा सन्मान अत्यंत प्रेरणादायी आहे.
CBSE Board Exam 2027: १०वी-१२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा?
याप्रसंगी त्यांनी ‘शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे संस्थापक व अध्यक्ष भजनसम्राट, कोयनारत्न राजाराम बुवा शेलार, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. माझ्या कर्तृत्वाची दखल घेऊन हा सन्मान दिल्याबद्दल मी प्रतिष्ठानचा मनापासून ऋणी राहीन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल