Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Academy Creative Awards: ‘सुभेदार’चा डबल धमाका! अनिल कपूर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता; चित्रपटालाही मोठा पुरस्कार

Anil Kapoor won Best Actor in Asian Academy Creative Awards : मेगास्टार अनिल कपूर यांनी ‘सुभेदार’ चित्रपटातील अर्जुन मौर्य यांच्या दमदार भूमिकेसाठी २०२६ एशियन अकादमी क्रिएटिव्ह पुरस्कारांमध्ये प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 04, 2026 | 07:42 PM
Anil Kapoor won Best Actor

Anil Kapoor won Best Actor

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
  • अनिल कपूर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता
  • आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर कब्जा
मेगास्टार अनिल कपूर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. Subedaar या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी अनिल कपूर यांना एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये (Asian Academy Creative Awards 2026) मध्ये बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल( Best Actor in a Leading Role )हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. अनेक दशकांच्या विलक्षण कारकिर्दीनंतरही अनिल कपूर हे त्यांचा सिनेमॅटिक प्रवासात कायम चर्चेत असतात.

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

सुभेदार सिनेमासाठी अवॉर्ड

सुभेदार (Subedaar) मध्ये अनिल कपूर यांनी अर्जुन मौर्य या निवृत्त सैनिकाची भूमिका साकारली आहे.आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक भ्रष्टाचाराविरोधात उभा राहत नागरी जीवनाशी जुळवून घेणाऱ्या निवृत्त सैनिक अर्जुन मौर्याची कपूर यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही मनाला खोलवर भिडली आहे या व्यक्तिरेखेतील संघर्ष, भावनिक चढ-उतार आणि अॅक्शनचा तडका अनिल कपूर यांनी प्रभावीपणे पडद्यावर साकारला आहे. त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही कौतुक झालं. आता, या चित्रपटाने भारतासाठी Best Feature Film हा पुरस्कारही जिंकला आहे.

विशेष म्हणजे सुभेदारने केवळ अनिल कपूर यांनाच वैयक्तिक सन्मान मिळवून दिलेला नाही, तर या चित्रपटाने भारतासाठी बेस्ट फिचर फिल्म हा पुरस्कारही पटकावला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरला आहे.

एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्सने केली पोस्ट

एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्सने ससोशल मीडियाच्या माध्यमातून अनिल कपूर यांच्या या यशाचं अभिनंदन केलं. त्यांच्या पोस्टमध्ये सुभेदारमधील उल्लेखनीय अभिनयासाठी अनिल कपूर यांना 2026 National Winner- Best Actor in a Leading Role म्हणून गौरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता ते एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स ग्रॅंड गाला फायनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. 3 डिसेंबर रोजी हा सोहळा पार पडणार असून मेगास्टार अनिल कपूर जागतिक मंचावर अभिमानाने भारतीय ध्वज घेऊन उभे राहतील.

भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक म्हणून मिळवलेल्या यशावर विसंबून न राहता ते सातत्यपूर्ण काम करत आहेत. या प्रवासाबद्दल बोलताना अनिल कपूर यांनी दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, आपल्या सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि हा सन्मान त्यांच्या कारकिर्दीत विशेष स्थान राखतो कारण हा चित्रपट बनवताना त्यांनी आणि संपूर्ण टीमने मनापासून घेतलेली मेहनत आणि जिद्द यात प्रतिबिंबित होत अस ते सांगतात.

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Web Title: Asian academy creative awards 2026 anil kapoor subedaar best actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Actor
  • Anil Kapoor
  • awarded
  • Indian Films

संबंधित बातम्या

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
1

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

International Award : सद्गुरू डॉ. मंगेशदा यांचा लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, भारताचा शिरपेचा मानाचा तुरा
2

International Award : सद्गुरू डॉ. मंगेशदा यांचा लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, भारताचा शिरपेचा मानाचा तुरा

Savani Ravindra: राष्ट्रीय पुरस्कारानंतर पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना आणखी मोठा सन्मान; ‘लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान
3

Savani Ravindra: राष्ट्रीय पुरस्कारानंतर पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना आणखी मोठा सन्मान; ‘लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.