Yuzvendra chahal retire from First Class Cricket
युझवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. चहलने लिहिले की, ‘ मी हातात घेतलेला पहिला क्रिकेटचा चेंडू लाल रंगाचा होता. मी १० वर्षांचा होतो आणि तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी या खेळाच्या इतका प्रेमात पडेन. लाल चेंडूचे क्रिकेट माझ्यासाठी कधीच केवळ एक प्रकार नव्हते. याच प्रकारात मी संयमाचा खरा आनंद, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि प्रत्येक धाव व प्रत्येक विकेटसाठी लढत, तासनतास मैदानावर टिकून राहण्याचा आनंद शिकलो.’
चहलने पुढे लिहिले की , ‘मी माझा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना लॉर्ड्सवर खेळलो. मी हे सांगताना खूप भावूक झालो आहे, कारण कसोटी संघात स्थान मिळवणे हे माझे नेहमीच एक स्वप्न होते, जे मी अनेक वर्षांपासून जपले होते. जरी ते स्वप्न पूर्ण झाले नाही, तरी मी माझ्या प्रवासाने खरोखरच समाधानी आहे आणि या फॉरमॅटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल मी खूप आभारी आहे. लाल चेंडूने मला माझ्या आयुष्यातील काही सर्वात सुंदर आठवणी दिल्या आहेत आणि त्या आठवणी कोणीही माझ्यापासून कधीही हिरावून घेऊ शकत नाही. पण माझा प्रवास अजून संपलेला नाही.’
चहल पुढे लिहिले की, ‘अजूनही माझ्यात देशासाठी खेळण्याची इच्छा आणि भूख आहे. माझा विश्वास आहे की माझ्यात अजूनही क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. मला एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आणखी एक संधी मिळवण्यासाठी मी माझे सर्वस्व देईन. हरियाणा क्रिकेट असोसिएशन, श्री. रणबीर सिंग महिंद्रा आणि श्री. अनिरुद्ध सिंग चौधरी यांचे विशेष आभार, ज्यांनी माझ्या संपूर्ण प्रवासात मला सातत्याने पाठिंबा दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. पहिल्यांदा लाल चेंडू हातात घेणाऱ्या १० वर्षांच्या मुलापासून ते माझा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना खेळण्यापर्यंत, हा खरोखरच एक अद्भुत प्रवास राहिला आहे.’
View this post on Instagram
लेग-स्पिनर चहलने आपला शेवटचा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर नॉर्थम्प्टनशायरकडून लाल चेंडूच्या क्रिकेट प्रकारात खेळला. चहलने आपल्या कारकिर्दीत ४९ प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने ३२.२७ च्या सरासरीने १४८ विकेट्स घेतले. त्याची सर्वोत्तम कामगिरी ६/२५ ही होती. अलीकडेच, तो नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला आणि लॉर्ड्सवर मिडलसेक्सविरुद्धच्या आपल्या शेवटच्या सामन्यात दोन विकेट्स घेतले. २०२६-२७ च्या हंगामात, या ३६ वर्षीय खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पाच सामने खेळले आणि २१ विकेट्स घेतले. त्याची सर्वोत्तम कामगिरी डरहॅमविरुद्ध होती, जिथे त्याने पहिल्या डावातील पाच विकेट्ससह एकूण नऊ विकेट्स घेतले.






