Ambedkar Statue to Be Installed at Bhadkal Gate by November 20 ( २० नोव्हेंबरपर्यंत भडकल गेट येथे आंबेडकरांचा पुतळा बसवला जाणार आहे.)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा २० नोव्हेंबरपर्यंत आणण्याचे आश्वासन देण्यात आले असून तसेच टीकी सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या कामांचाही आढावा घेण्यात येणार आहे.
नगरसेवक अमित भुईगळ यांच्यासह अन्य नगरसेवकांनी पुतळ्यांच्या कामांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ७ डिसेंबरपूर्वी बसविण्यात यावा, अशी मागणी भुईगळ यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून न राहता महापालिकेने स्वतः लक्ष घालून ही कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, अशी भूमिकाही नगरसेवकांनी मांडली.
यावर उत्तर देताना महापौर राजूरकर यांनी सांगितले की, पुतळ्यांच्या कामांसाठी यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या असून, काम पूर्ण करण्यासाठी टप्पेनिहाय कालमर्यादा (माइलस्टोन) निश्चित करण्यात आली आहे. या नियोजनानुसार प्रत्यक्ष काम सुरू आहे की नाही, याची तपासणी आयुक्तांनी दोन दिवसांत करावी. कामांमध्ये विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शहर अभियंता संजय कोंबडे यांनी सभागृहात कामाची माहिती दिली. भडकलगेट येथील पुतळ्याच्या परिसरातील सिव्हिल वर्क ९५ टक्के पूर्ण झाले असून, पुतळ्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर महापौरांनी महापालिकेमार्फत सुरू असलेले पुतळ्याचे काम पूर्ण करून २० नोव्हेंबरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भडकलगेट येथे आणण्यात येईल, असे आश्वासन दिले.
Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी






