Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३२ व्या सामन्यात झिम्बाब्वे आणि आयर्लंड आमनेसामने येणार होते. परंतु, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आल्याने झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एंट्री केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 17, 2026 | 06:24 PM
ZIM vs IRE: Big blow for Australia! Match against Ireland cancelled due to rain! Zimbabwe enters Super 8

ZIM vs IRE: Big blow for Australia! Match against Ireland cancelled due to rain! Zimbabwe enters Super 8

Follow Us
Close
Follow Us:

ZIM vs IRE, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३२ वा सामना  झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणार होता. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, टॉस लवकर होऊ शकला नाही. पाऊस थांबेल या आशेवर टॉस पुढे ढकलण्यात आला, परंतु पावसाचा जोर कायम राहिला त्यामुळे टॉस होऊ शकला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे   झिम्बाब्वे संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवला.

हेही वाचा :  Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी

झिम्बाब्वे संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामना थेट रद्द झाल्याने दोन्ही संघाना एक एक गुण देण्यात आला आहे. अशाप्रकारे एक गुण मिळवून झिम्बाबे तीन सामन्यात ५  गूणांसह थेट सूपर ८  मध्ये पोहचला आहे. तर आयर्लंडचचे ४ सामन्यात तीन गुण झाले असल्याने ते या स्पर्धेतून बाहेर होणार आहेत.पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि झिम्बाबे सूपर  ८ मध्ये पोहोचला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सूरलेल्या आशा संपुष्ठात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया ओमान विरूद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. पण या सामन्यामुळे ते जास्तीत जास्त ४  गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे या विजयाचा ऑस्ट्रेलियाला काहीच फायदा होणार नाही आहे आणि ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पडल्याने, सुपर ८ मध्ये भारत कोणत्या(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६)संघांचा सामना करेल हे निश्चित झाले आहे. २२ फेब्रुवारी रोजी, भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. त्यानंतर, २६ फेब्रुवारी रोजी, सूर्या आणि त्याचे खेळाडू चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेशी दोन हात करतील. शेवटच्या सुपर ८ मध्ये, भारतीय संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे.

हेही वाचा : इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

आयर्लंड इलेव्हन: रॉस अडायर, टिम टेक्टर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रीज, जोशुआ लिटिल

झिम्बाब्वे  इलेव्हन : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, सिकंदर रझा (क), रायन बर्ल, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, ग्रॅमी क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा

 

Web Title: Zim vs ire match against ireland called off due to rain zimbabwe enters super 8s

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • T20 cricket
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
1

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.