इम्रान खानसाठी 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र(फोटो-सोशल मीडिया)
Cricket captains appeal to Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात प्रकृती बिघडली असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यानंतर जगभरातील क्रिकेट दिग्गज खान यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यामध्ये माजी भारतीय कर्णधार कपिल देव आणि सुनील गावस्कर यांच्याकडून पाकिस्तान सरकारला इम्रान खान यांना निष्पक्ष आणि आदराने वागवण्याची विनंती करण्यात आली आहे.
माजी क्रिकेटपटूंनी एकत्रितपणे १९९२ च्या तुरुंगवासात असलेल्या विश्वचषक विजेत्या आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना “निष्पक्ष आणि मानवीय वागणूक” देण्यायाबाबतची मागणी केली आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारला त्वरित वैद्यकीय मदत देण्याची विनंती देखील केली आहे.
ऑस्ट्रेलियन महान ग्रेग चॅपेल यांच्या सहकार्याने हे आवाहन तयार केले गेले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हे आवाहन राजकीय मुद्द्यांच्या पलीकडे असून ते क्रीडाभावना आणि सामान्य मानवतेच्या भावनेवर आधारित आहे. असे त्या पत्रात म्हटले आहे.
माजी कर्णधारांनी असे देखील सांगितले की, “क्रिकेट नेहमीच राष्ट्रांमधील पूल म्हणून काम करत आला असून मैदानावरील आपला सामायिक इतिहास आपल्याला आठवण करून देतो की खेळात स्पर्धा असून देखील आदर आणि सभ्यता अबाधित राहते. इम्रान खानने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ही भावना जपली आणि दाखवली. आम्ही अधिकाऱ्यांना हे कायम ठेवण्याची विनंती करत आहोत.”
मायकेल आथर्टन, अॅलन बोर्ड, मायकेल ब्रेअरली, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, सुनील गावस्कर, डेव्हिड गॉवर, किम ह्यूजेस, नासेर हुसेन, सर क्लाईव्ह लॉयड, कपिल देव, स्टीव्ह वॉ, जॉन राईट.






