Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zimbabwe vs AFG Test : १२ वर्षांची प्रतीक्षा संपली! घरच्या मैदानावर अफगाणिस्तानला पराभूत करत झिम्बाब्वेने रचला इतिहास 

झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा एक डाव आणि ७३ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने आपल्या घरच्या मैदानार तब्बल १२ वर्षांनंतर कसोटी सामना जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 22, 2025 | 09:16 PM
Zimbabwe vs AFG Test: 12 years of wait is over! Zimbabwe creates history by defeating Afghanistan at home

Zimbabwe vs AFG Test: 12 years of wait is over! Zimbabwe creates history by defeating Afghanistan at home

Follow Us
Close
Follow Us:

Zimbabwe vs AFG Test : कसोटी क्रिकेट युगात झिम्बाब्वेसाठी पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. झिम्बाब्वेने  अफगाणिस्तान कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत त्यांनी कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय आपल्या नावावर नोंदवला. झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा एक डाव आणि ७३ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा हा तिसरा डावातील विजय ठरला आहे आणि हा विजय संघाचे सर्वात संस्मरणीय यश असल्याचे  मानले जात आहे.

हेही वाचा : PAK VS SA : असे कसोटी पदार्पण होणे नाही! आसिफ आफ्रिदी या पाकिस्तानी गोलंदाजाने वयाच्या 38 व्या वर्षी रचला इतिहास

अफगाणिस्तानचा डावाने पराभव

हरारे येथे खेळवण्यात आलेल्या या कसोटी सामन्यात, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फक्त १२७ धावाच उभारू शकला. रहमानउल्लाह गुरबाजने संघाकडून सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. त्यानंतर, झिम्बाब्वेने फलंदाजी करताना ३५९ धावांचा मोठा आकडा गाठला. झिम्बाब्वेकडून बेन करनने १२१ धावांची शानदार खेळी साकारली, तर सिकंदर रझाने ६५ धावा काढल्या.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजीमुळे दुसऱ्या डावातह देखील अफगाणिस्तानच्या फलदाजांची चांगलीच दैना उडवली आणि त्यांना फक्त १५९ धावाच करता आल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने ४२ आणि बशीर शाहने ३२ धावा करून संघाला थोडे सावरले. परंतु एकूण धावसंख्या झिम्बाब्वेच्या पहिल्या डावापेक्षा देखील खूपच कमी होती. परिणामी, झिम्बाब्वेने सामना एक डाव आणि ७३ धावांनी आपल्या नावे केला.

झिम्बाब्वेने मिळवला ऐतिहासिक विजय

या विजयासह झिम्बाब्वेने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. झिम्बाब्वे संघाने यापूर्वी दोनदा डावाने विजय मिळवला होता. ज्यात १९९५ मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला एक डाव आणि ६४ धावांनी धूळ चारली होती. त्यानंतर, २०२१ मध्ये त्यांनी बांगलादेशला एक डाव आणि ३२ धावांनी पराभूत केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, झिम्बाब्वेने जवळजवळ १२ वर्षांनी मायदेशात कसोटी सामना आपल्या खिशात टाकला आहे. त्यांचा शेवटचा घरचा विजय २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्ध आला होता.

हेही वाचा : Women World Cup 2025 : पाकिस्तान संघाला मोठा झटका! ICC विश्वचषकातील पराभवानंतर PCB उचलले मोठे पाऊल

झिम्बाब्वेसाठी हा विजय खुप महत्वाचा ठरला आहे. हा विजय केवळ विक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून  संघाचा आत्मविश्वास आणि देशांतर्गत क्रिकेटची पातळी देखील दर्शविणारा आहे.  या विजयाने प्रेक्षक आणि चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

Web Title: Zimbabwe vs afg test zimbabwe defeats afghanistan to win test match at home after 12 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Zimbabwe cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.