भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. कामानिमित्त किंवा इतर कारणासाठी बाहेर जायचं असेल तर आपण मुंबई लोकलने प्रवास करतो. मात्र रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. दररोज अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याने याचा गैरफायदा घेत अनेक प्रवासी घेत आहेत. मात्र आता या फुकट्या प्रवाश्यांवर कारवाई केली जाणार आहे.
मध्य रेल्वेने केलेल्या कारवाईनुसार. २०२३-२४ या वर्षात मध्य रेल्वेकडून ४६.२६ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रवाशांकडून दंड घेण्यात आला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या लोकांकडून ३०० कोटी रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात मध्य रेल्वे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. विना तिकीट फिरणे आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांची तिकीट नियमित तपासली जाणार आहे. त्यामुळे फुकट फिरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे.
मध्य रेल्वेकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये तिकीट तपासणी पथकाकडून वर्ष २०२३-२४ (एप्रिल २०२३ ते मार्च-२०२४) मध्ये ४६.२६ लाख प्रवाश्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांचा दंड वसूल करून घेण्यात आला आहे. ही महत्वपूर्ण कामगिरी मध्य रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेकडून २६५.९७ कोटी महसूल असून यंदाच्या वर्षी १२.८० टक्क्यांनी ओलांडण्याचे लक्ष आहे. सर्व विभागांमध्ये सगळ्यात जास्त कमाई मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
महसूल विभाग
मुंबई २०.५३ लाख प्रवासी ११५.२९ कोटी दंड
भुसावळ ८.३४ लाख प्रवासी ६६.३३ कोटी दंड
नागपूर ५.७० लाख प्रवासी ३४.५२ कोटी दंड
सोलापूर ५.४४ लाख प्रवासी ३४.७४ कोटी दंड
पुणे ३.७४ लाख प्रवास २८.१५ कोटी दंड
सुनील नैनानी, प्रवासी तिकीट निरीक्षक (मुंबई) २०,११७ दंड १ कोटी ९२ लाख रु
एम एम शिंदे- मुख्य तिकीट निरीक्षक (मुंबई) १८हजार २२३ दंड १ कोटी ५९ लाख रु
धर्मेंद्र कुमार- प्रवासी तिकीट निरीक्षक (मुंबई) १७हजार ६४१ दंड १कोटी ५२ लाख रु
रुपाली माळवे-महिला वरिष्ठ तिकीट परीक्षक (पुणे) ५ हजार दंड १ कोटी ३१ लाख रु