
Fitnessचा नाद असेल तर 'हे' 5 गॅझेट्स (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ज्या लोकांना धावायला खूप आवडत त्यांच्यासाठी Garmin Forerunner 165 हे एकदम नंबर घड्याळ आहे. यामध्ये 1.2 इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले असून एकदा चार्ज केले की, आरामात 11 दिवस चालणार आहे .
अजून कोणती गोष्ट खास आहे?
बऱ्याच लोकांना व्यायाम करताना हातात मोठं घड्याळ घालायला आवडत नाही. घड्यामुळे हाताला घाम येतो तसेच जड वाटतं अशा लोकांसाठी ही अंगठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. Ultrahuman Ring AIR अंगठीचे नाव असून ही फक्त 2.4 ग्रॅमची आहे, एकदम हलकी. फायटर जेटमध्ये जे मेटल वापरतात त्या टायटॅनियमपासून बनली आहे.
कोणती गोष्ट खास आहे?
कोणती गोष्ट खास आहे?
अॅडिडासच्या गुरुग्राम टेक हबला मोठा धक्का; 350 हून जास्त कर्मचाऱ्यांवर कपातीची शक्यता
आपण व्यायाम करतो पण पाणी प्यायला विसरतो. डिहायड्रेशनमुळे खूप थकवा येतो. त्यासाठी ही स्मार्ट बाटली आहे, जसं HidrateSpark.ही बाटली ब्लूटूथने तुमच्या मोबाईलला कनेक्ट होते. तुमचं वय, वजन आणि तुम्ही किती व्यायाम करता यावरून ती तुम्हाला दिवसभरात किती पाणी प्यायचं आहे याचं टार्गेट देते. आणि सगळ्यात भारी म्हणजे पाणी प्यायची वेळ झाली की या बाटलीचा खालचा भाग लाईटसारखा चमकतो. म्हणजे तुम्ही पाणी प्यायला विसरणारच नाही.
वजन काट्यावर उभं राहून फक्त वजन बघणं ही जुनी गोष्ट झाली. आता नवीन स्मार्ट काटे आले आहेत, जसे Withings चे.हे काटे BIA टेक्नॉलॉजी वापरतात. म्हणजे पायातून एक छोटीशी लहर सोडतात आणि तुमच्या बॉडीत किती चरबी आहे, किती मसल आहे, तुमचा BMI किती आहे हे सगळं मोबाईलवर दाखवतात. फक्त वजन कमी झालं म्हणजे फिट झालात असं नाही, आतून बॉडी कशी आहे हे या काट्यावरून कळतं.तर मित्रांनो, जर तुम्हाला खरंच फिट राहायचं असेल तर हे गॅझेट्स घ्या. फक्त व्यायाम करणं नाही, तर बॉडीला समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे.