Karwa Chauth 2025: बायकोला खुश करण्याचा हाच आहे ‘गोल्डन चान्स’, हे 6 गिफ्ट्स आज करतील कमाल
करवा चौथ 2025 च्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या बायकोला यूनिक आणि मॉडर्न गिफ्ट द्यायंच आहे का? साडी, बॅग आणि मेकअप किट नाही तर या करवा चौथला तुमच्या बायकोला स्मार्ट टेक प्रोडक्ट्स द्या. हे असे गिफ्ट्स आहेत जे तुमच्या पार्टनरला त्यांच्या रोजच्या जीवनात मदत करणार आहेत तसेच यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला खूश देखील करू शकता. आरोग्य असो, म्यूजिक असो किंवा स्मार्टफोन अपग्रेड असो, या टेक भेटवस्तू तुमच्या नात्यात एक नवीन “टेक-टच” जोडतील.
जर तुमच्या पार्टनरला स्मार्टफोनची आवड असेल तर तुम्ही तुमच्या बायकोला Motorola Edge 60 Fusion 5G हा स्मार्टफोन गिफ्ट म्हणून देऊ शकता. याची किंमत 20,999 रुपये आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 50MP डुअल रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक फेस्टिव मोमेंट परफेक्ट क्लिक केला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये Dimensity 7400 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो चांगला परफॉर्मंस ऑफर करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Realme P3 Pro 5G च्या ग्लो-इन-द-डार्क डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या डिव्हाईसची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट, 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh दमदार बॅटरी देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये Sony IMX896 OIS कॅमेरा देण्यात आला आहे, फोनमध्ये IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस देण्यात आला आहे. गिफ्ट देण्यासाठी हा एक उत्तम डिव्हाईस आहे.
केवळ 2,699 रुपयांच्या किंमतीत boAt Nirvana Zenith Pro TWS ईयरबड्स तुम्ही तुमच्या पत्नीला भेट म्हणून देऊ शकता. हे ईयरबड्स प्रीमियम साउंड क्वालिटीसह 50dB हाइब्रिड ANC आणि Hi-Res ऑडियो सपोर्ट देण्यात आला आहे. या डिव्हाईसचा 80 तासांचा प्लेटाइम आणि फक्त 10 मिनिटे लवकरात लवकर चार्जिंगसह 250 मिनिटांचा बॅकअप त्यांना अद्वितीय बनवतो. तुमच्या जोडीदारासोबत लांब ड्राइव्ह किंवा रोमँटिक संगीत सत्रांसाठी ते परिपूर्ण पर्याय आहेत.
आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम
19,999 रुपयांत Elista Amrit Alkaline Water Purifier एक उत्तम गिफ्ट ऑप्शन ठरणार आहे. हा केवळ एक वॉटर प्यूरीफायर नाही तर एक हेल्थ गिफ्ट आहे. यामध्ये 9-स्टेज फिल्ट्रेशन सिस्टम, UV आणि UF टेक्नोलॉजीसह इंस्टेंट हॉट वॉटर डिस्पेंसर (95°C पर्यंत) देण्यात आले आहे. चाइल्ड लॉक फीचर, डिजिटल TDS डिस्प्ले आणि Active Copper Chamber सह हे पाण्याला मॅग्नीशियम, कॅल्शियम आणि झिंकसारखे महत्त्वाचे मिनरल्स देते.
14,999 रुपयांत Elista Shuddh Alkaline Purifier खरेदी केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस 7-स्टेज फिल्ट्रेशन आणि 4-लीटर टँकसह येते. याचे Toughened Glass डिझाईन आधुनिक किचनचा परफेक्ट भाग आहे.
जर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला गाण्याची आवड असेल तर 5,499 रुपयांत उपलब्ध असणारे QCY SP7 Bluetooth Speaker सर्वात चांगली निवड आहे. यामध्ये 40W आउटपुट, क्वाड ड्राइवर्स आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटी देण्यात आली आहे. IPX7 वॉटरप्रूफ रेटिंग, 14 तासांची बॅटरी लाइफ आणि RGB लाइटिंग इफेक्ट्स यामुळे ते घरातील आणि बाहेरील वापरासाठी परिपूर्ण आहे.