iPhone 17 Air मध्ये होणार हे 6 मोठे बदल! iPhone 16 Plus पेक्षा किती वेगळा असणार? एका क्लिकवर वाचा सर्वकाही
Apple दरवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करतो. आता देखील कंपनीची आगामी आयफोन 17 सिरीज सप्टेंबरमध्येच लाँच केली जाऊ शकते. आगामी आयफोन 17 सिरीजमध्ये चार मॉडेल्स लाँच केले जाणार आहेत. ज्यातील एक मॉडेल असणार आहे iPhone 17 Air. आयफोन सिरीजमधील प्लस मॉडेलच्या जागी आता आयफोन 17 एअर लाँच केला जाणार आहे. या आगामी iPhone 17 Air बाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहेत. त्याचा लूक, त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स अशी बरीच माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीमध्ये आयफोन 17 एअरबाबात बरीच माहिती देण्यात आली आहे. शिवाय आगामी आयफोन iPhone 16 Plus पेक्षा किती वेगळा आहे, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. आगामी आयफोनमध्ये 6 मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 17 Air मध्ये 5.5mm टाइटेनियम-ग्लास डिझाइन दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 16 Plus च्या 7.8mm अॅल्यूमीनियम बॉडीपेक्षा आगामी आयफोन खूप पातळ असणार आहे. असं सांगितलं जात आहे की, यामध्ये फिजिकल सिम ट्रेला हटवलं जाणार आहे आणि eSIM-ओनली फॉर्मेट दिलं जाणार आहे.
iPhone 16 Plus मध्ये युजर्सना 60Hz रिफ्रेश रेट दिला जातो. तर यावेळी 17 एयर 120Hz प्रोमोशन आणि ऑलवेज-ऑन टेक्नोलॉजीसह 6.55-इंच OLED डिस्प्ले ऑफर केला जाऊ शकतो, जो एक स्मूथ आणि प्रीमियम एक्सपीरियंस देणार आहे.
iPhone 16 Plus तुम्हाला 48MP + 12MP चा डुअल-कॅमेरा ऑफर करतो. तर अपकमिंग 17 Air डुअल-फंक्शनलिटीसह सिंगल 48MP रियर लेंस आणि 24MP फ्रंट कॅमेरा ऑफर करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होणार आहे आणि सेल्फीची क्लाविटी देखील सुधारणार आहे.
iPhone 17 Air मध्ये अॅप्पल ची नवीन A19 चिप दिली जाण्याची शक्यता आहे, जो iPhone 16 Plus मधील A18 चिपच्या तुलनेत अधिक चांगला परफॉर्मेंस आणि एफिशिएंसी देते. नवीन डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि AI फीचर्स दिले जाऊ शकतात.
iPhone 17 Air ची किंमत 16 Plus एवढीच असण्याची शक्यता आहे. अॅपल त्यांच्या नॉन-प्रो लाइनअपमध्येही बदल करत आहे. जे आता एअर मॉडेलसह वेगळे बनवेल.
iPhone 16 Plus मध्ये 4674 mAh बॅटरी दिली आहे. तर अल्ट्रा-स्लिम 17 Air मध्ये छोटी बॅटरी दिली जाऊ शकते.