Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
स्मार्टफोन कंपनी Vivo लवकरच त्यांचे नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Vivo T4 Lite, Vivo Y19sGT आणि Vivo Y29t 5G यांचा समावेश असणार आहे. लाँचिंगपूर्वी हे तिन्ही स्मार्टफोन्स Google Play सपोर्टेड डिवाइसवर लिस्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी विवोचे हे अपकमिंग स्मार्टफोन Bluetooth SIG प्लॅटफॉर्मवर देखील स्पॉट करण्यात आले आहेत.
एका अहवालानुसार, Vivo चे अपकमिंग फोन गूगल प्ले सपोर्टेड डिवाइसच्या लिस्टमध्ये मॉडेल नंबर V2509, V2526, आणि V2527 सह स्पॉट करण्यात आले आहेत. यामध्ये Vivo T4 Lite स्मार्टफोन देखील सहभागी आहे. यासोबतच कंपनी आणखी दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे, ज्यामध्ये Vivo Y19sGT 5G आणि Vivo Y29t 5G यांचा समावेश असू शकतो. हे स्मार्टफोन Vivo Y19 आणि Vivo Y29 सीरीजचे मेंबर असणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google Play सपोर्टेड डिवाइसच्या लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि हार्डवेयर डिटेल्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अपकमिंग Vivo Y29t आणि Vivo Y19sGT 5G स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, हे स्मार्टफोन Vivo Y29 आणि Vivo Y19 नावाने लाँच केले जाऊ शकतो. हे स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये डिसेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतात.
अशी शक्यता वर्तवला जात आहे की, हे स्मार्टफोन्स मे महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले जाऊ शकतात. Vivo T4 Lite स्मार्टफोनला Bluetooth SIG प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर V2509 सह स्पॉट करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन iQOO Z9 Lite चा रिब्रँड वर्जन असणार आहे. iQOO Z9 Lite स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी जुलैमध्ये लाँच केला होता. ज्याची सुरुवातीची किंमत10,499 रुपये होती. त्यामुळे आगामी स्मार्टफोन देखील याच रेंजमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
अपकमिंग Vivo T4 Lite स्मार्टफोनद्दल असं सांगितलं जात आहे की, हा फोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या iQOO Z9 Lite 5G चा रिब्रँड वर्जन असणार आहे. हा स्मार्टफोन भारतात जुलै महिन्यात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व केवळ चर्चा आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. Bluetooth SIG मध्ये या स्मार्टफोनच्या नावाव्यतिरिक्त कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खरं तरं, Vivo V2504 (Vivo T4 Ultra ) स्मार्टफोन गेल्या महिन्यात Geekbench प्लॅटफॉर्मवर स्पॉट करण्यात आला होता, ज्याला त्यावेळी Vivo V50 Pro मानले जात होते. आता असे दिसते की ते Vivo T4 Ultra असेल. मात्र कंपनीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
गीकबेंच लिस्टिंगनुसार अशी माहिती मिळाली आहे की, वीवोच्या या फोनने सिंगल-कोर टेस्टमध्ये 1,178 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 4,089 स्कोर मिळवला आहे. या लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की, हया फोनला k6989v1_64 चिपसेट दिला जाणार आहे, जो MediaTek Dimensity 9300 Plus असू शकतो.