Aadhaar द्वारे होणार Starlink यूजर्सचं व्हेरिफिकेशन, भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सर्विस!
भारत सरकारने अधिकृतपणे एलन मस्कला भारतात सॅटलाईट इंटरनेट सर्विस स्टारलिंक सॅटेलाइट सुरू करण्याची परवानगी दिली आहे. स्टारलिंकबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता देखील पुन्हा एकदा स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. ज्या भागात नेटवर्क नाही किंवा ग्रामीण भागात जिथे नेटवर्क वापरण्यात अनेक अडचणी निर्माण होतात, अशा भागांसाठी सॅटॅलाइट इंटरनेट सर्विस अत्यंत फायद्याची ठरणार आहे. स्टारलिंकच्या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतात एक वेगळी आशा निर्माण झाली आहे. आता असं सांगितलं जात आहे की युजर्सना स्टारलिंकची सर्विस वापरण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे.
भारतात नवीन युजर्स जोडण्यासाठी Starlink ने आधार e-KYC ऑथेंटिकेशनचा निर्णय घेतला आहे. यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. तसेच यामध्ये युजरची सुरक्षा देखील कायम ठेवली जाईल. त्यामुळे ही सर्विस विश्वसनीय तसेच फायदेशीर ठरणार आहे. आधार आधारित डिजिटल ओळखीचा वापर करून युजर्स लांबलचक पेपरवर्कपासून मुक्ती मिळवू शकतात. तसेच यामुळे कंपनीला देखील फायदा होऊ शकतो. डिजिटल ओळखीमुळे युजर्स अगदी सहजपणे Starlink सोबत जोडले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्स नुसार, स्टारलिंक भारतात सुमारे 20 लाख म्हणजेच दोन मिलियन ग्राहक जोडण्याची तयारी करत आहे. एवढा मोठा यूजर बेस पारंपारिक इंटरनेट सेवांच्या मदतीने जोडणे सोप्प नाही. मात्र Aadhaar e-KYC सिस्टमद्वारे हे कार्य अगदी सहजपणे पूर्ण केले जाऊ शकते. यामुळे गावे, छोटे व्यवसाय, शाळा आणि संस्थांना देखील हाय स्पीड इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे, ज्या ठिकाणी इंटरनेट एक मोठी समस्या होती ही समस्या अगदी सहज सोडवली जाणार आहे,
स्टारलिंक आणि UIDAI यामध्ये झालेल्या करारावेळी अनेक महत्त्वाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. यामध्ये UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार, डिप्टी डायरेक्टर जनरल मनीष भारद्वाज आणि Starlink इंडिया चे डायरेक्टर पर्निल उर्ध्वरेशे यांचा समावेश आहे. याप्रसंगी स्टारलिंकला Sub-Authentication User Agency (S-AUA) आणि Sub-eKYC User Agency (S-eKYC) च्या रूपात अधिकृतपणे नियुक्त केले गेले.
भारतातील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी स्टारलिंकने यापूर्वीच Reliance Jio आणि Bharti Airtel सारख्या दिग्गज टेलिकॉम ऑपरेटर सोबत पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिपमुळे युजर्सची संख्या वाढणार आहे तसेच भारतात डिजिटल स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर देखील मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना आता आशा आहे की स्टारलिंक सॅटेलाइट सुरू झाल्यानंतर एअरटेल आणि जिओचे नेटवर्क अधिक चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटी ऑफर करेल. वेगवान इंटरनेट ग्रामीण आणि सीमावृत्ती भागात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे. सुरक्षित वेरिफिकेशन आधार e-KYC द्वारे ग्राहकांना आता अधिक चांगली आणि सुरक्षित सर्विस दिली जाणार आहे.
आधार आधारित पडताळणी आणि एअरटेल-जिओसोबत भागीदारीमुळे स्टारलिंकला भारतात एक मजबूत सुरुवात मिळेल. यामुळे केवळ लोकांचा इंटरनेटचा वापर वाढणार नाही तर शिक्षण, आरोग्य आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात डिजिटल क्रांतीचा एक नवा अध्यायही लिहिला जाईल.