पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पुन्हा नवं षडयंत्र! Cyber War ची केली जातेय तयारी, भारतीय सैनिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
भारत – पाकिस्तान युद्धाचे संकेत निर्माण होत आहेत. पाकिस्तानमधून केल्या जाणाऱ्या कुरघोड्या सुरुच आहे. पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीयांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मू – काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. जिथे अनेक भारतीयांना त्यांचा जीव गमवावा लागला. या सर्वानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आणि बदला घेण्याची भावना निर्माण झाली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार की टळणार? AI ने दिलं धक्कादायक उत्तर! म्हणाला, युद्ध झालं तर…
जम्मू – काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या पहलगाम हल्ल्यातून भारत सावरत असतानाच आता पाकिस्तानने नवं षडयंत्र सुरु केलं आहे. पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ला करण्याची तयार करत आहे. भारत पाकिस्तानची ही लढाई आता केवळ सिमेपुरती मर्यादित न राहता सायबर स्पेसपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अलीकडेच भारतीय सैन्यासोबत जोडलेल्या अनेक शैक्षणिक संस्थावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये भारतीय सैन्याचे पब्लिक स्कूल, नर्सिंग कॉलेज आणि रक्षा मंत्रालयाचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांचा समावेश आहे. या सर्वामुळे आता भारतीय सेनेला सतर्क राहण्याचे आवाहन सरकारने केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका वृत्तानुसार, सेना वेलफेयर एजुकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या आर्मी पब्लिक स्कूल (APS) नागरोटा आणि एपीएस सुंजवांची वेबसाइट्स हॅक करण्यात आली होती. ज्यामुळे ही वेबसाईट सोमवार संध्याकाळपर्यंत बंद होती. यापूर्वी 25 एप्रिल रोजी जालंधर छावनी स्थित आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगची वेबसाइट देखील ‘TEAM INSANE PK’ नावाच्या हॅकर ग्रुपने हॅक केली होती. यानंतर या वेबसाईटवर नागरिकांना भडकवणारे फोटो आणि संदेश अपलोड करण्यात आले होते.
मनोहर पर्रिकर इंस्टीट्यूट फॉर डिफेंस स्टडीज एंड एनालिसिस (MP-IDSA) वर कथित पाकिस्तान साइबर फोर्सने 10GB डेटा चोरी केल्याचा दावा केला आहे. यामध्ये 1600 हून अधिक यूजर्सची माहिती असल्याचा आरोप आहे. मात्र संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
आर्मर्ड व्हीकल निगम लिमिटेड (AVNL) च्या वेबसाइटला सुरक्षा ऑडिटसाठी ऑफलाइन ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तान सायबर फोर्स द्वारे शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये वेबसाईटचा इंडियन टॅग काढून पाकिस्तानी टॅग लावला होता. ज्यामध्ये लिहीलं होतं की, “Your security is illusion. MES data owned.” (तुमची सुरक्षा हा भ्रम आहे. MES डेटा मालकीचा आहे.)
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. आता सर्वांचे लक्ष फक्त युद्धावर आहे. युद्ध होणार की नाही याचा प्रत्येकजण विचार करत आहे. दरम्यान, ‘इंटरनेट ऑफ खिलाफत’, ‘HOAX1337’ आणि ‘नॅशनल सायबर क्रू’ सारख्या गटांनीही इतर लष्कराशी संबंधित संस्थांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय एजन्सींनी वेळीच त्यांना हाणून पाडले.