भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार की टळणार? AI ने दिलं धक्कादायक उत्तर! म्हणाला, युद्ध झालं तर...
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पाऊल उचलली आहेत. पाकिस्तानाला अद्दल घडवण्यासाठी भारत प्रचंड प्रयत्न करत आहेत. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानात देखील युद्धाबाबत अनेक घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये युद्ध होणार आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल तणाव आता चर्चेचा विषय बनला आहे. युद्ध झालं तर काय होईल आणि युद्ध न झाल्यास पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा याबाबत आता प्रत्येकजण आपलं मत मांडत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत पूर्ण प्रयत्न करत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेले हे सर्व प्रश्न आता AI ला विचारण्यात आले आहेत. भारत – पाकिस्तानच्या युद्धाच्या प्रश्नांवर आता AI ने उत्तर दिलं आहे. युद्ध झालं तर काय होऊ शकतं आणि युद्ध टाळण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात, याबाबत AI ने माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर AI ने त्याला विचारलेल्या प्रश्नांची अगदी सोप्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. AI ने म्हटलं आहे की, भारत आणि पाकिस्तानात पारंपारिक युद्धाची शक्यता अत्यंत कमी आहे. परंतु सीमेवर तणाव आणि लहान-मोठ्या संघर्ष सुरूच राहू शकतात. दोन्ही देशांकडे परमाणु हत्यार आहेत, यामुळे कोणत्याही मोठ्या युद्धा दरम्यान संपूर्ण दक्षिण एशियाला नुकसान होऊ शकतं. याच सर्व गोष्टिंचा विचार करता होणारे युद्ध टाळण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार मुत्सद्देगिरी, वाटाघाटी आणि आंतरराष्ट्रीय दबावाचा अवलंब करतो.
युद्ध व्हावं किंवा होणार आहे, असं मत तर अनेकांनी मांडलं आहे. या युद्धानंतरचे परिणाम देखील सांगितलं जात आहे. मात्र युद्ध का व्हावं याबाबत अनेकांना माहिती नाही. याबाबत देखील AI ला विचारण्यात आलं होतं. यावेळी युद्ध झालं तर त्याची कारण काय असू शकतात, हे AI ने सांगितलं आहे.
कश्मीर मुद्दा – भारत आणि पाकिस्तानमधील वर्षानुवर्षे सुरु असलेला तणावाचा मुद्दा आणि सर्वात कठिण समस्या.
सीमेवर सुरु असणारा दहशतवाद – भारतीय सिमेवर पाकिस्तानातून केले जाणारे दहशतवादी हल्ले तणावाचा आणि हल्ल्याचा विषय बनत आहे.
राजकीय वक्तृत्व – देशांतर्गत राजकारणामुळे पाकिस्तानी नेते आक्रमक विधाने करतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
AI ने म्हटलं आहे की, दोन्ही देशांमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी संवाद सुरु ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यापार, खेळ, आणि सांस्कृतिक आदान-प्रदान हे विश्वासाचे माध्यम आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांना आळा घालणं हा देखील युद्ध टाळण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचं AI ने म्हटलं आहे.