Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Ai+ Nova 2 Neo 5G And Nova 2 Pro 5G Launched: भारतीय स्मार्टफोन कंपनीने दोन नवीन डिव्हाईस लाँच केले आहेत. या बजेट स्मार्टफोनमध्ये 48MP कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी दिली आहे. स्मार्टफोन्सची विक्री 26 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 10:27 AM
Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच... फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच... फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Ai+ ने भारतात दोन नवे 5G फोन लाँच केले.
  • दोन्ही फोन्समध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • Nova 2 Neo आणि Nova 2 Pro ची विक्री 26 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
Ai+ Smartphone Launched: भारतीय स्मार्टफोन कंपनी Ai+ ने देशात दोन नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Ai+ Nova 2 Neo 5G आणि Nova 2 Pro 5G यांचा समावेश आहे. पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह हे दोन्ही स्मार्टफोन्स डिझाईन करण्यात आले आहेत. बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोन्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

स्लिम लूक अन् पावरफुल फीचर्स! 5,600mAh बॅटरीसह नव्या Tecno स्मार्टफोनची एंट्री… ‘या’ कलर ऑप्शन्सची चर्चा

Ai+ Nova 2 Neo 5G आणि Nova 2 Pro 5G ची किंमत

एआयप्लस नोव्हा 2 निओ 5G दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 128GB आणि 6GB + 128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. एआयप्लस नोव्हा 2 प्रो 5G स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफरअंतर्गत कंपनी 1000 रुपयांचे बँक डिस्काऊंट देणार आहे. स्मार्टफोनची विक्री 26 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)

Neo vibes and Pro moves! Ready to level up your game? Nova 2 Neo 5G & Nova 2 Pro 5G sale goes live 26 June at 12 PM, on Flipkart. Set your reminders.#AiPlusSmartphone #NovaSeries #IndiasGotNova #Nova2Pro5G #Nova2Neo5G pic.twitter.com/YCDKKNpgVt — Ai+ Smartphone (@aiplus_official) June 22, 2026

एआयप्लस नोव्हा 2 निओ 5जी आणि नोव्हा 2 प्रो 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

एआयप्लस नोव्हा 2 निओ 5जी स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राईटनेस 600 निट्सपर्यंत आहे. यासोबतच फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे, जो 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंक वाढवले जाऊ शकते.

एआयप्लस कंपनीचा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित NxtQuantum ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 48-मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स 582 रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे.

एआयप्लस नोव्हा 2 प्रो 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.9-इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 144Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स ब्राइटनेस असलेला FHD+ LCD पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 2 टीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 48-मेगापिक्सेलचा सोनी IMX582 प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेंस आणि 13-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन स्टीरियो स्पीकर आणि कस्माइजेबल रियर नोटिफिकेशन लाइटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह आईपी 65 रेटिंगची सुविधा मिळणार आहे. दोन्ही एआयप्लस फोन्स ‘NxtQuantum OS’ वर चालतात. ही कंपनीची अँड्रॉईड 16 वर आधारित खास ‘युजर इंटरफेस’ (UI) प्रणाली आहे.

Web Title: Ai plus nova 2 neo 5g and nova 2 pro 5g launched in india read features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.