Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक
Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
मिळालेल्या माहितीनुसार, नथिंग लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन Phone 4(b) या नावाने सादर केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनचे नाव किंवा लाँच डेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. या आगामी स्मार्टफोनचा एक व्हिडीओ नथिंग इंडियाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामुळे लाँचिंगपूर्वीच स्मार्टफोनचे डिझाईन रिव्हिल झाले आहे. कंपनीने यापूर्वीच भारतीय बाजारात Phone 4(a) आणि Phone 4(a) Pro हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. त्यानंतर आता कंपनी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. (फोटो सौजन्य – X)
(b)usted. pic.twitter.com/b42Lk709lM — Nothing India (@nothingindia) June 21, 2026
नथिंग इंडियाच्या एक्स अकाऊंटवर बजेट फोनचा टिझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एका सिंगल कॅमेऱ्याच्या फोनचे स्केच बनत असल्याचे दिसत आहे. फोनच्या मागील बाजूला कॅमेऱ्यासह Glyph इंटरफेस दिला जाऊ शकतो. यामध्ये बाजूला वॉल्यूम कंट्रोल आणि पावर बटन पाहायला मिळणार आहे. याशिवाय, खालील बाजूला यूएसबी टाईप सी पोर्ट पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंपनीने कॅप्शनमध्ये (b)usted लिहीले आहे. यामुळे फोनचे नाव Phone (b) असू शकते. आगामी स्मार्टफोनमध्ये सिंगल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.
नथिंगच्या या आगामी स्मार्टफोनची मायक्रोसाईट फ्लिपकार्टवर देखील लाईव्ह झाली आहे. यामुळे हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याची शक्यता आहे. फोनच्या बॅक पॅनलमध्ये फ्लॅट डिझाईन पाहायला मिळू शकते. काही दिवसांपूर्वी CMF ने त्यांचे काही स्मार्टफोन प्रोजेक्ट नथिंगकडे दिले आहेत. त्यामुळे आता अशी शक्यता देखील आहे की, हा आगामी स्मार्टफोन CMF द्वारे डिझाईन केला जाऊ शकतो.
WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कार्ल पेई यांनी पुष्टी केली आहे की, नथिंग या वर्षी फ्लॅगशिप फोन लाँच करणार नाही. त्यामुळे आता ब्रँडचा मुख्य फोकस मिड-रेंज आणि बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनवर असणार आहे. कंपनीने या वर्षी मार्चमध्ये नथिंग फोन 4a आणि फोन 4a प्रो लाँच केले होते. या सिरीजची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होते. नथिंगच्या या आगामी फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असू शकते.






