स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोम 6जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज या व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. या डिव्हाईसच्या 6जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आणि 8 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन ग्लोडन ब्लू फ्यूजन, ब्लू फ्यूजन, ओसियन ग्रीन, डीप पर्पल आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: Flipkart)
Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी मध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 720×1,600-पिक्सेल आणि ब्राईटनेस 450 निट्सपर्यंत आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट आणि 8 जीबीपर्यंत रॅमसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित nxtQ OS वर चालतो, ज्यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.
Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी मध्ये 48-मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स 582 प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, ज्यासोबत 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. रिअर पॅनेलमध्ये कॅमेरा सेंसरसह एलईडी फ्लॅश दिले आहे. फोनचा रियर कॅमेरा 2K रेजोल्यूशन व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. स्मार्टफोनच्या समोर 13-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन IP65 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात ड्युअल सिम, 5G, 4G VoLTE, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, ग्लोनास, बायडू, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टला सपोर्ट मिळतो.






