Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Ai plus Nova 2 Power 5G Launched: टेक कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2026 | 12:23 PM
स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Follow Us
Follow Us:
  • Ai+ Nova 2 Power 5G भारतीय स्मार्टफोन बाजारात दाखल
  • दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये नवा स्मार्टफोन लाँच
  • 7,000mAh बॅटरीसह मिळणार 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट
Ai+ Smartphone Launched:टेक कंपनी Ai+ ने भारतीय स्मार्टफोन बाजारात एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Ai+ Nova 2 Power 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा एआय प्लस कंपनीच्या Nova 2 सीरीजचा दुसरा स्मार्टफोन आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी आणि इतर दमदार फीचर्ससह लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली रेंजमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तर जाणून घेऊया.

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी ची किंमत

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोम 6जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज या व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. या डिव्हाईसच्या 6जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आणि 8 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन ग्लोडन ब्लू फ्यूजन, ब्लू फ्यूजन, ओसियन ग्रीन, डीप पर्पल आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य: Flipkart) 

Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी मध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 720×1,600-पिक्सेल आणि ब्राईटनेस 450 निट्सपर्यंत आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट आणि 8 जीबीपर्यंत रॅमसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित nxtQ OS वर चालतो, ज्यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.

Ai+ नोव्हा 2 पॉवर 5जी मध्ये 48-मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स 582 प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, ज्यासोबत 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. रिअर पॅनेलमध्ये कॅमेरा सेंसरसह एलईडी फ्लॅश दिले आहे. फोनचा रियर कॅमेरा 2K रेजोल्यूशन व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. स्मार्टफोनच्या समोर 13-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन IP65 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात ड्युअल सिम, 5G, 4G VoLTE, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, ग्लोनास, बायडू, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टला सपोर्ट मिळतो.

Web Title: Ai plus nova 2 power 5g smartphone launched in india in budget friendly price range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत
1

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
2

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

Best Selfie Camera Smartphones 2026: फोटोप्रेमींसाठी मोठी खुशखबर! कॅमेऱ्यात भारी ‘हे’ 4 नवे स्मार्टफोन चर्चेत
3

Best Selfie Camera Smartphones 2026: फोटोप्रेमींसाठी मोठी खुशखबर! कॅमेऱ्यात भारी ‘हे’ 4 नवे स्मार्टफोन चर्चेत

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
4

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.