
Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार 'ग्लोइंग कॅट' डिझाईन, चाहते थक्क
आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश
जारी करण्यात आलेल्या टिझरवरून समजते की, या डिव्हाईसच्या मागील पॅनलवर एक नवीन ग्लोईंग लाईट फीचर मिळू शकते. यामध्ये स्क्वॉयर-शेप्ड कॅमेरा मॉड्यूलसह एक फ्लॅट रियर पॅनल देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Weibo वरील एका पोस्टमध्ये टेक कंपनीने ओप्पो रेनो 17 चे डिझाईन टिझ करत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये टॉप-लेफ्ट कॉर्नरमध्ये एक स्क्वॉयर-शेप्ड कॅमेरा मॉड्यूलसह फ्लॅट रियर पॅनल देखील दिसणार आहे. कॅमेरा आयलँडमध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टिम आणि एक एलईडी फ्लॅशसह रेनोचे ब्रँडिंग पाहायला मिळणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये एक ग्लोइंग कॅट-लाइक डिझाईन एलिमेंट देखील पाहायला मिळत आहे. ज्यामुळे स्मार्टफोनला आणखी आकर्षक लूक मिळाला आहे.
ग्लोइंग कॅट फिगर कंपनीच्या Weibo पेजवरील इतर मार्केटिंग साहित्यातही दिसून येते. कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही की, हे डिझाईन एलीमेंट ओप्पो रेनो 17 आणि ओप्पो रेनो 17 प्रो या दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध असणार की नाही. हे हँडसेट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. यात सिल्वर शेडमध्ये फिनिश्ड एक फ्लॅट मेटल मिड-फ्रेम देखील असेल. हँडसेटच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल्स दिलेले असतील.
ओप्पो रेनो 17 सिरीज चीनमध्ये 9 नोव्हेंबर रोजी ओप्पो पॅड एअर 6 आणि ओप्पो वॉच 5 सह लाँच केला जाणार आहे. लीक्सवरून असे संकेत मिळाले आहेत की, ओप्पो रेनो 17 मध्ये 6.5-इंच डिस्प्ले मिळणार आहे, तर प्रो मॉडेलमध्ये 6.3-इंच टचस्क्रीन मिळणार आहे. स्टँडर्ड मॉडेल कथीतपणे ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेटवर आधारित असणार आहे. तर ओप्पो रेनो 17 प्रो मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8550 प्रोसेसर मिळण्याची शक्यताा आहे.
ओप्पो रेनो 17 सीरीजच्या दोन्ही फोनमध्ये तीन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन्स पर्याय मिळणार आहेत. ज्यामध्ये 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या पर्यायांचा समावेश असू शकतो. याव्यतिरिक्त, लीक झालेल्या माहितीनुसार हा हँडसेट पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होईल, ज्यामध्ये कोकोआ ब्राऊन, एन्काउंटर कॅट, आइस मून व्हाइट, स्नो व्हाइट आणि स्टारलाइट पिंक (चिनी भाषेतून भाषांतरित) यांचा समावेश असेल.
Ans: Oppo Reno 17 सीरिज चीनमध्ये 9 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे.
Ans: Oppo Reno 17 आणि Reno 17 Pro सोबत Oppo Pad Air 6 आणि Oppo Watch 5 देखील लाँच केले जाणार आहेत.
Ans: या स्मार्टफोनमध्ये फ्लॅट रियर पॅनल, स्क्वॉयर-शेप्ड कॅमेरा मॉड्यूल आणि आकर्षक ग्लोइंग कॅट-लाइक डिझाईन एलिमेंट मिळण्याची शक्यता आहे.