Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

एअरटेलचे 'सेफ नेटवर्क' आता नेटवर्क-आधारित डिजिटल सुरक्षा साधनांच्या एका सर्वसमावेशक संचामध्ये विकसित झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये, एअरटेलने नेटवर्क स्तरावर एआय ड्रिव्हन स्पॅम डिटेक्शन सिस्टिम सुरू केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 26, 2026 | 01:57 PM
सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Airtelच्या AI-आधारित ‘सेफ नेटवर्क’मुळे ग्राहकांना स्पॅम कॉल, मेसेज आणि सायबर फसवणुकीपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
  • कंपनीच्या म्हणण्यानुसार, एअरटेलने आतापर्यंत 16.2 लाखांहून अधिक मालिशस लिंक्स ब्लॉक केल्या असून 98.4 अब्जांहून अधिक स्पॅम कॉल्स ओळखले आहेत.
  • ओटीपी फ्रॉड प्रोटेक्शन, मालिशस लिंक डिटेक्शन आणि बिझनेस नेम डिस्प्ले यांसारख्या फीचर्सचा ‘सेफ नेटवर्क’मध्ये समावेश आहे.
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मात्र या प्रगतीसोबत सायबर फसवणूक करण्याच्या पद्धतीत बदल होत आहे आणि फसवणूकीचे प्रमाण देखील वाढले आहे. यापूर्वी प्रामुख्याने स्पॅम कॉल्स आणि फिशिंग मेसेजेसचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात होती. मात्र आता लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार सतत नवीन पद्धतींचा वापर करत आहेत. इम्पर्सोनेशन स्कॅम्स, बनावट बँकिंग रिक्वेस्ट्स, मालिशस लिंक्स, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि ओटीपी स्कॅमच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात.

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

गेल्या ६ वर्षांत ५२,९७६ कोटींहून अधिक रक्कम गमावली

सरकार आणि इंडस्ट्रीच्या डेटावरून असे समजते की, ही समस्या आता मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आय४सी) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांनी सायबर फसवणुकीमुळे ₹५२,९७६ कोटींहून अधिक रक्कम गमावली आहे. हा डेटा केवळ गेल्या ६ वर्षांचा आहे. एनसीआरबीच्या डेटामधूनही सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

टेलिकॉम कंपन्यांकडून डिजीटल सर्विसेसच्या सुरक्षेची अपेक्षा

खरं तर आपल्या दैनंदिन जीवनात बँकिंग, पेमेंट्स, हेल्थकेअर, कॉमर्स आणि सरकारी सेवांसह डिजिटल सर्व्हिसेसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डिजीटल सर्विसेसच्या सुरक्षेत टेलिकॉम नेटवर्क्सची भूमिका अधिक महत्त्वाची ठरू शकते. कारण आता यूजर्स टेलिकॉम कंपन्यांकडून केवळ चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीच नाही तर डिजीटल सर्विसेसच्या सुरक्षेची देखील अपेक्षा करत आहेत.

यूजर्सच्या याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी २०२४ मध्ये एअरटेलने पहिले नेटवर्क-बेस्ड, एआय-आधारित स्पॅम डिटेक्शन सोल्युशन लाँच केले. यामध्ये नेटवर्क इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एकत्रित वापर करण्यात आला होता. ज्यामुळे ग्राहकांना स्पॅम कॉल्स आणि एसएमएसपासून संरक्षण मिळू शकेल.

यानंतर कंपनीने एआय-आधारित सेफ नेटवर्क इनिशिएटिव्हचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. यामागील उद्देश असा होता की, ग्राहकांना अतिरिक्त ॲप्स इन्स्टॉल करण्याची किंवा थ्रेट्स मॅन्युअली रिपोर्ट करण्याची गरज भासू नये. एअरटेलचे ‘सेफ नेटवर्क’ आता नेटवर्क-आधारित डिजिटल सुरक्षा साधनांच्या एका सर्वसमावेशक संचामध्ये विकसित झाले आहे. यामधील प्रमुख घटक जाणून घेऊया.

ओटीपी संबंधित फ्रॉड प्रोटेक्शन

एअरटेलने एआय (AI) आधारित एक सुरक्षा प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली संशयास्पद संभाषणादरम्यान वापरकर्त्यांना ओटीपी किंवा इतर संवेदनशील माहिती शेअर करण्यास सांगितले जात असल्याचे ओळखते आणि अशा प्रसंगी हस्तक्षेप करते.

मालिशस लिंक डिटेक्शन

ओटीपी फ्रॉड डिटेक्शन प्रणाली सुरू करण्यापूर्वी, एअरटेलने फसव्या वेबसाइट्स आणि संशयास्पद लिंक्स रिअल-टाइममध्ये ओळखण्यासाठी एक प्रणाली लागू केली. ही प्रणाली सुरू झाल्यापासून, सर्व मोबाइल आणि वाय-फाय ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एसएमएस, मेसेजिंग ॲप्स, ईमेल आणि ब्राउझर रीडायरेक्टद्वारे शेअर केलेल्या १६.२ लाखांहून अधिक दुर्भावनापूर्ण लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

स्पॅम कॉल आणि मेसेज डिटेक्शन

सप्टेंबर २०२४ मध्ये, एअरटेलने नेटवर्क स्तरावर एआय ड्रिव्हन स्पॅम डिटेक्शन सिस्टिम सुरू केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तेव्हापासून या प्रणालीने ९८.४ अब्जांहून अधिक स्पॅम कॉल्स आणि ४.४ अब्ज स्पॅम मेसेजेस ओळखले आहेत.

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

बिझनेस नेम डिस्प्ले

एअरटेलने ‘बिझनेस नेम डिस्प्ले’ हे वैशिष्ट्य देखील सादर केले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना प्रमाणित व्यावसायिक कॉल्स आणि संभाव्य बनावट किंवा फसव्या क्रमांकांमधील फरक ओळखण्यासाठी मदत होते. यामुळे बँकिंग किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांकडून होणाऱ्या घोटाळ्यांचा धोका कमी होण्यास मदत होते.

Web Title: Airtel ai safe network new protection against spam calls otp fraud and malicious links

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.