बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनची किंमत 9,649 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन लॅव्हेंडर पर्पल, सिल्व्हर मिस्ट आणि क्लासिक ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी या स्मार्टफोनसोबत 100 दिवसांची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट पॉलिसी देखील ऑफर करत आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनची खरेदी आणखी खास ठरणार आहे. (फोटो सौजन्य: ZENO)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.56 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 720×1612 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 90Hz पर्यंत आहे. डिव्हाईसमध्ये यूनिसोक T7100 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळणार आहे, ज्याची क्लॉक स्पीड 2.2GHz पर्यंत आहे. यासोबतच, या स्मार्टफोनमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये वर्चुअल रॅम एक्सपेंशन देखील मिळणार आहे, ज्याद्वारे रॅम 8GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. याप्रमाणे फोनमध्ये एकूण 12GB पर्यंत रॅम मिळू शकते.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 8MP कॅमेरा आहे.
या डिव्हाईसमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आहे. डिव्हाईसमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहे. मोठ्या बॅटरीमुळे स्मार्टफोन दिर्घकाळ वापरला जाऊ शकतो.
फोनमध्ये अँड्रॉईड 16 गो एडीशन आहे. हे अँड्रॉईडचे हलके वर्जन आहे, ज्यामुळे एंट्री-लेवल हार्डवेयरवाल्या फोनसाठी डिझाईन करण्यात आला आहे. फोनला MIL-STD-810H स्टँडर्डअंतर्गत टेस्ट करण्यात आहे. यामध्ये मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी मिळणार आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक, 3.5mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये यूएसबी टाइप-सी ओटीजी, 4G एलटीई, डुअल 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि जीपीएस सारखे कनेक्टिविटी फीचर्स देखील मिळणार आहे.






