8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
कंपनीचा नवीन स्मार्टफोन 6GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 1,999 Yuan म्हणजेच सुमारे 24,000 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्टारडस्ट, स्काय ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक रंगाच्या पर्यायात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
नव्या विवो स्मार्टफोनमध्ये 6.87-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1592 x 720 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे, जी डिसी डिमिंगला सपोर्ट करते. यासोबतच हा स्मार्टफोन सॉफ्टवेयर लेवल लो ब्लू-लाइट प्रोटेक्शन के लिए TÜV Rheinland सर्टिफिकेशनने सुसज्ज आहे.
नवा स्मार्टफोन 44W पर्यंत वायर्ड चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीने दावा केला आहे की, एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर हा फोन शॉर्ट व्हिडिओ प्लेबॅकसाठी 25 तास आणि नेव्हिगेशनसाठी 16 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकतो.
विवो स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6GB चे एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB चे यूएफएस 2.2 स्टोरेज मिळणार आहे. फोनचे स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. तसेच, रॅम एक्सपेंशन फीचरच्या मदतीने रॅम 12 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो. या फोनमध्ये अनेक एआय फीचर्स देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, विवो वाय 600 आय मध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. यासोबतच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे. या फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, डुअल-सिम 5G, यूएसबी टाइप-सी आणि इंफ्रारेड ब्लास्टर देखील दिला आहे.






