
Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या
भारतीय वंशाचे अमर सुब्रमण्य यांनी यापूर्वी माइक्रोसॉफ्ट आणि गूगल डीपमाइंडमध्ये महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. त्यानंतर आता ते टेक जायंट कंपनी अॅपलसोबत काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2024 मध्ये अॅपल इंटेलीजेंस डिवीजनची सुरुवात झाल्यानंतर लीडरशिप लेव्हलवर हा पहिला मोठा बदल करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
अॅपलच्या लीडरशीपमध्ये हा बदल अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा कंपनी AI च्या प्रगतीमध्ये इतर कंपन्यांपेक्षा मागे आहे. कंपनी त्यांच्या डिव्हाईसमध्ये मोठे AI फीचर्स देऊ शकली नाही, तसेच सिरीला देखील AI ने सुसज्ज करण्यासाठी कंपनीला मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत नेतृत्व बदलण्यात आले आहे. त्यामुळे आता अमर सुब्रमण्य यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. अमर सुब्रमण्य त्यांच्यावर पदावर काम करत असताना अॅपलचे सॉफ्टवेयर चीफ क्रेग फेडेरिघी यांना रिपोर्ट करणार आहेत. क्रेग देखील कंपनीत AI संबंधित एक महत्त्वाची भुमिका पार पाडत आहेत.
AI एक्सपर्ट अमर माइक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत होते. आता त्यांची अॅपलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विभागाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. माइक्रोसॉफ्टमध्ये ते AI कॉर्पोरेट वाइस प्रेसिडेंटची भुमिका पार पडत होते. यापूर्वी त्यांनी गुगलमध्ये 16 वर्षे काम केले होते. गुगलमध्ये अमर सुब्रमण्य जेमिनी असिस्टेंटच्या इंजीनियरिंगचे प्रमुख होते. अमर सुब्रमण्य यांच्या नियुक्तीबाबत अॅपलने म्हटलं आहे की, AI मशीन लर्निंग आणि रिसर्चला प्रोडक्ट आणि फीचरमध्ये इंटीग्रेट करण्यात अमर सुब्रमण्य पारंगत आहेत. त्यांचे हेच काम अॅपलच्या इनोवेशन आणि अॅपल इंटेलीजेंसच्या आगामी फीचर्समध्ये प्रमुख भुमिका पार पाडणार आहे.
अमर सुब्रमण्य आता अॅपलमध्ये फाउंडेशन मॉडल्स, मशीन लर्निंग रिसर्च आणि AI संबंधित अत्यादी महत्त्वाच्या उपक्रमांचे नेतृत्व करणार आहेत. त्यांचे शिक्षण आणि आतापर्यंतचा असलेला अनुभव यामुळे टेक विश्वातील एक विश्वसनीय व्यक्ती म्हणून त्यांना संबोधले जाते. कंपनीला आशा आहे की, अमर सुब्रमण्य यांच्या अनुभवामुळे AI आणि मशीन लर्निंगमध्ये मोठा बदल होणार आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, “आम्ही अमरचे संघात स्वागत करतो आणि क्रेगच्या नेतृत्वाखाली त्याच्या अद्भुत एआय अनुभवाचा फायदा आम्हाला होईल.”
Ans: Amar Subramanya हे एक अनुभवी टेक्नोलॉजी लीडर आहेत, ज्यांनी AI, मशीन लर्निंग आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात अनेक वर्षे काम केले आहे.
Ans: Apple ने त्यांची AI Chief या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली असून, कंपनीच्या भविष्यातील AI स्ट्रॅटेजी, जनरेटिव्ह AI आणि Siri सारख्या प्रॉडक्ट्समधील AI प्रगतीवर ते काम पाहणार आहेत.
Ans: ते यापूर्वी Google, YouTube किंवा इतर मोठ्या टेक कंपन्यांमध्ये वरिष्ठ AI/ML नेतृत्वाच्या पदांवर कार्यरत होते (तुमच्या न्यूजला अनुरूप माहिती टाकू शकता).