फोटो सौजन्य- सोशल मीडिया
जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या Amazon च्या कर्मचाऱ्यांचा डेटा लिक झाल्याचं समोर आलं आहे. कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती जसं की, ईमेल, फोन नंबर हकर्सच्या हाती लागली आहे. Amazon ने याबाबत खुलासा करत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हॅकर्स हल्ला एका थर्ड पार्टी वेंडरवर झाला आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा डेटा लिक झाला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हॅकर्सनी केलेल्या या हल्ल्यात AWS (Amazon Web Services) किंवा कंपनीच्या मुख्य सिस्टमवर कोणताही परिणाम झालेला नाही.
हेदेखील वाचा- Jiostar Coming Soon! नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या अडचणी वाढल्या, लवकरच लाँच होणार नाव ॲप
मात्र थर्ड पार्टी वेंडरवर झालेल्या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती कॉन्ट्रॅक्ट इन्फर्मशन, ईमेल्स, फोन नंबर्स, बिल्डिंग लोकेशन, अशी माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे. हा हल्ला MOVEit Transfer संबंधित आहे, ज्याने गेल्या वर्षी जगातील अनेक संस्थांना त्याचा बळी बनवले होते. आता ई-कॉमर्स कंपनी Amazon या MOVEit Transfer हल्ल्याची बळी ठरली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
MOVEit Transfer ही एक प्रकारची वल्नरबिलिटी आहे, ज्याने जगभरातील कंपन्यांमध्ये घुसखोरी केली आणि संवेदनशील डेटा मिळवला. या प्रकारची वल्नरबिलिटी फाइल ट्रान्सफरद्वारे कंपन्यांच्या सर्व्हरवरपर्यंत पोहोचवली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Name3L3ss नावाच्या कथित हॅकिंग ग्रुपने चोरीचा डेटा BreachForums वर लीक केला आहे. MOVEit Transfer ला बळी पडणारी Amazon ही पहिली कंपनी नाही. रिपोर्ट्सनुसार, HP आणि HSBC सारख्या कंपन्यांनाही याचा सामना करावा लागला आहे.
या प्रकरणी ॲमेझॉनचे प्रवक्ते ॲडम माँटगोमेरी यांनी म्हटले आहे की, या सायबर हल्ल्यामुळे ॲमेझॉनच्या प्रमुख सिस्टमवर जसे की ॲमेझॉन आणि AWS सिस्टमवर कोणताही परिणाम झालेला नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा डेटा – जसे ऑफिस ईमेल, डेस्क फोन नंबर आणि इमारतीचा पत्ता लीक झाला आहे. मात्र, कंपनीने आतापर्यंत आपल्या किती कर्मचाऱ्यांचा डेटा लीक झाला हे सांगितलेले नाही.
हेदेखील वाचा- रबर की डिस्प्ले? LG ची कमाल! लाँच केला जगातील पहिला स्ट्रेचेबल डिस्प्ले
MOVEit Transfer हॅक हा 2023 मधील सर्वात धोकादायक सायबर हल्ल्यांपैकी एक होता, ज्यामुळे शेकडो कंपन्या आणि सरकारी संस्थांवर परिणाम झाला होता. HP आणि HSBC सारख्या कंपन्यांनाही याचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता Amazon या सायबर हल्ल्याची बळी ठरली आहे. Amazon ची मुख्य सिस्टम सुरक्षित असली तरी, त्यांना त्यांच्या थर्ड पार्टी वेंडरकडून सुरक्षा समस्यांचा सामना करावा लागला आहे. प्रत्येक कंपनीने त्यांच्या मुख्य सिस्टमसोबतच थर्ड पार्टी वेंडरच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा डेटा लिक होणं ही प्रत्येक कंपनीसाठी धोकादायक ठरू शकतं.