Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

भारतात लवकरच स्टारलिंक सॅटलाईट इंटरनेट सर्विस सुरु होणार आहे. याची तयारी देखील सुरु झाली आहे. मात्र भारतात सॅटेलाईट सर्विस सुरु होण्यापूर्वीच एक नवीन आणि मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2025 | 08:38 AM
Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • प्रोजेक्ट कुइपरचं नाव बदललं
  • एंटरप्राइजेजसाठी याच वर्षी सुरु होणार Amazon Leo ची सर्विस
  • हजारो सॅटेलाईटच्या मदतीने कनेक्टिव्हिटी प्रदान करणार
सॅटेलाईट इंटरनेट प्राव्हाईड करणारी एलन मस्कची कंपनी स्टारलिंक भारतात लवकरच सुरु होणार आहे. स्टारलिंकची भारतात सर्विस सुरु होण्याआधीच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची तयारी सुरु झाली आहे. स्टारलिंकला टक्कर देण्यासाठी Amazon त्यांची नवीन Amazon Leo सर्विस सुरु करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी हा प्रोजेक्ट कुइपर नावाने ओळखला जात होता. मात्र आता या प्रोजेक्टचं नाव बदलण्यात आलं आहे. प्रोजेक्ट कुइपरचं नाव बदलून आता कंपनीने याला Amazon Leo असं नाव दिलं आहे.

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

कधी सुरु होणार Amazon Leo ची सर्विस?

असं सांगितलं जात आहे की, एंटरप्राइजेजसाठी Amazon Leo ची सर्विस याच वर्षी तर सामान्य यूजर्ससाठी Amazon Leo ची सर्विस पुढील वर्षी सुरु होणार आहे. Amazon चं असं म्हणणं आहे की, कंपनी हजारो सॅटेलाईटच्या मदतीने अशा भागांमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे, ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. कंपनीने या प्रोजक्टचं नाव का बदललं आणि ही सर्विस कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

कंपनीने का बदललं प्रोजेक्टचं नाव?

Amazon चं असं म्हणणं आहे की, डोंगराळ आणि खेडेगाव यासोबतच मोठ्या शहरांमध्ये देखील अशी काही ठिकाण असतात, जिथे इंटरनेट कनेक्शन पोहोचू शकत नाही. त्यामुळे सॅटेलाईट नेटवर्कच्या मदतीने या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाते. Amazon गेल्या अनेक वर्षांपासून प्रोजेक्ट कुइपरवर काम करत आहे, मात्र आता कंपनीने या प्रोजेक्टचं नावच बदललं आहे. Amazon Leo नावावरून हे समजतं की, ही सिस्टिम लॉ अर्थ ऑरबिट (LEO) मध्ये प्लेस करण्यात आलेल्या सॅटलाईटद्वारे चालणार आहे.

Amazon Leo कसं काम करणार?

जमीनीवर Amazon चे गेटवे एंटीना लावलेले असतात, जे सॅटेलाइटसोबत डेटा एक्सचेंज करतात. यानंतर ग्राहक त्यांच्या घरी किंवा ऑफीसमध्ये छोटे अँटीना वापरणार आहेत. स्पीडच्या आधारावर Leo Nano, Leo Pro आणि Leo Ultra ची निवड केली जाऊ शकते. यामध्ये एडवांस्ड प्रोसेसर लावलेले असतात, ज्यामुळे हे सॅटेलाइटने डायरेक्ट इंटरनेट कनेक्टिविटी प्रदान करते.

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

3,000 सॅटेलाइट लाँच करणार Amazon

Amazon ची योजना स्पेसमध्ये 3 हजार सॅटेलाईट लाँच करण्याची आहे. हे सर्व एकत्र काम करतील, जेणेकरून ग्राहकांना मजबूत आणि स्थिर कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. हे सॅटेलाइट अवकाशात पाठवण्यासाठी, Amazon ने SpaceX, Blue Origin, Arianespace आणि ULA कडून 80 रॉकेट प्रक्षेपण बुक केले आहेत. हे संपूर्ण नेटवर्क पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागण्याची अपेक्षा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Starlink इंटरनेट कसे काम करते?

    Ans: हे हजारो Low-Earth Orbit (LEO) सॅटेलाइट्सद्वारे इंटरनेट सिग्नल पृथ्वीवरील युजर्सपर्यंत पोहोचवते.

  • Que: भारतात Starlink उपलब्ध आहे का?

    Ans: सध्या Starlink ला भारतात पूर्ण व्यावसायिक परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • Que: Starlink इंटरनेट स्पीड किती असतो?

    Ans: स्पीड साधारण 50 Mbps ते 150 Mbps, काही ठिकाणी यापेक्षा अधिक देखील मिळू शकतो.

Web Title: Amazon is planning to launch satellite internet service which will compete with starlink know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • amazon
  • internet
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स…
1

Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स…

IITian Pranita Pujari Apple Job: ॲपलला राम राम ठोकला! मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप
2

IITian Pranita Pujari Apple Job: ॲपलला राम राम ठोकला! मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
3

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय

Amazon Great Indian: अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये लहान व्यवसायांची मोठी झेप; विक्रीत ३.५ पट वाढ
4

Amazon Great Indian: अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये लहान व्यवसायांची मोठी झेप; विक्रीत ३.५ पट वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.