
जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
एचएमडीने लाँच केलेल्या नव्या फीचर फोनची किंमत 79.99 ब्रिटिश पाउंड म्हणजेच सुमारे 10,160 रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या हा फोन ब्रिटेनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
कंपनीद्वारे लाँच करण्यात आलेल्या एचएमडी 2660 फ्लिप सीनियर एडिशन डिव्हाईसमध्ये Mary AI असिस्टेंटचा सपोर्ट मिळणार आहे, जे डिव्हाईसच्या इंटरफेसमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजेच AI असिस्टेंट Mary चा वापर करण्यासाठी वेगळे कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची देखील गरज भासणार नाही.
तसेच, Mary AI असिस्टेंटचे सेटअप करणं देखील अत्यंत सोपे आहे. यूजर फोनच्या मेन्यूमधून Mary निवडून कॉल बटन दाबू शकतात. हे असिस्टेंट सामान्य विषयांवर संवाद साधू शकते, गोष्टी एकवू शकते आणि स्मरणशक्ती वाढवणारे गेम खेळण्यासाठी मदत करू शकते. तसेच, संभाषणादरम्यान शेअर करण्यात आलेली माहिती देखील AI असिस्टेंट Mary लक्षात ठेऊ शकते. यामुळे पुढील संभाषण आणखी वैयक्तिक बनवू शकते.
लाँच करण्यात आलेल्या नव्या फीचर फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 2.8 इंच QVGA प्रायमरी डिस्प्ले आणि 1.77 इंच सेकेंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये युनिसोक T107 प्रोसेसर, 48MB रॅम आणि 128MB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. यासोबतच या नव्या डिव्हाईसमध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील मिळणार आहे, ज्यामुळे फोनचे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
डिव्हाईसमध्ये VGA रियर कॅमेरा, एलईडी फ्लॅश, वायरलेस एफएम रेडियो, MP3 प्लेयर आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळणार आहे. याशिवाय या फोनमध्ये 1,450mAh रिमूवेबल बॅटरी देखील मिळणार आहे. तसेच या नव्या फोनमध्ये 4G VoLTE, ब्लूटूथ 4.2 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईस S30+ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते आणि यामध्ये मोठे फिजिकल बटन देखील देण्यात आले आहेत.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, या फोनची किंमत 79.99 ब्रिटिश पाउंड म्हणजेच अंदाजे 10,160 रुपये आहे.
Ans: या फोनमध्ये Mary AI असिस्टंट देण्यात आला आहे. तो वापरकर्त्यांशी संवाद साधू शकतो, गोष्टी ऐकवू शकतो आणि स्मरणशक्ती वाढवणारे गेम खेळण्यास मदत करू शकतो.
Ans: या फोनमध्ये 2.8 इंचांचा मुख्य QVGA डिस्प्ले आणि 1.77 इंचांचा सेकेंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे.