Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स...
प्रत्येक नवीन मोबाईल फोनच्या बॉक्सवर आणि डिव्हाईसमध्ये IMEI नंबरचा स्टिकर लावलेला असतो. जर फोनच्या बॉक्सवर हा स्टिकर नसेल तर काही गडबड असू शकते.
संचार साथी पोर्टलवर जाऊन व्हेरिफाय करू शकता की IMEI नंबर खरा आहे की बनावट.
संचार साथी वेबसाईट ओपन करा आणि सिटीझन सेंटर सर्विसमध्ये जाऊन Know Your Mobile पर्याय निवडा.
आता मोबाईल नंबर, कॅप्चा आणि ओटीपी एंटर करून IMEI नंबर टाईप करा. आता तुमच्या फोनची सर्व माहिती दिसू लागेल.
सेलमधून डिस्काऊंट आणि ऑफर्सच्या नावाखाली स्मार्टफोन खरेदी करताना सावध असणं गरजेचं आहे, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.