
आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा
Amazon Pay ने UPI ट्रांजेक्शनसाठी एक नवीन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स पिन टाकल्याशिवाय पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. हे नवीन फीचर लाँच करणारा Amazon Pay पहिलाच प्लॅटफॉर्म ठरला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन फीचरनंतर आता भारतातील यूजर्स पिन एंटर केल्याशिवाय पेमेंट करू शकणार आहेत. फिंगरप्रिंट आणि फेस-बेस्ड पेमेंटला मंजुरी देणारी ही भारतातील पहिली पेमेंट सर्विस प्रोवाइडर बनली आहे. हे नवीन अपडेट यूजर्सना पिन एंटर केल्याशिवाय UPI पेमेंट ऑथराइज करण्याची सुविधा देते, ज्यामुळे पेमेंटची प्रक्रिया वेगाने होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
या नवीन सिस्टिमद्वारे Amazon Pay UPI यूजर्स, डिव्हाईसच्या फिंगरप्रिंट स्कॅन किंवा फेशियल रिकग्निशनसारख्या बायोमेट्रिक सिक्योरिटीद्वारे 5,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकणार आहेत. हे फीचर कॉन्टॅक्ट्सला पैसे पाठवणं, मर्चंट स्कॅन करून पेमेंट करणं आणि अकाऊंट बॅलेंन्स चेक करण्यासारखी कामं अगदी सहज पूर्ण करू शकतात. Amazon Pay ने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या वापरावरून असा अंदाज लावला जात आहे, हे फीचर वापरताना यूजर्सना अत्यंत आनंद होत आहे.
रिपोर्टनुसार, 90 टक्क्यांहून अधिक UPI ट्रांजेक्शन PIN-बेस्ड ऑथेंटिकेशनऐवजी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनद्वारे ऑथराइज करण्यात आले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही पद्धत जास्त सुरक्षित आणि एक्स्ट्रा स्टेप कमी करणारी आहे. हे नवीन फीचर यूजर्ससाठी फायद्याचं ठरत आहे. सध्या, Amazon Pay वरील UPI बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केवळ अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कारण या प्लॅटफॉर्मद्वारे सपोर्टेड डिव्हाईसलेव्हल बायोमेट्रिक सिस्टिमवर अवलंबून आहे. हे विशेषतः ऑफलाइन व्यापारी पेमेंटच्या बाबतीत, एका हाताने वापरण्यासाठी आणि जलद चेकआउटसाठी डिझाइन केलेले आहे.
Ans: Amazon Pay ही Amazon ची डिजिटल पेमेंट सेवा आहे, ज्याद्वारे तुम्ही UPI, कार्ड, नेट बँकिंग किंवा Amazon Pay बॅलन्स वापरून ऑनलाईन पेमेंट करू शकता.
Ans: नवीन फीचर वापरून तुम्ही UPI पेमेंट फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीने ऑथेंटिकेट करू शकता. यासाठी Amazon Pay अॅपमध्ये Enable Fingerprint/Face Unlock पर्याय ऑन करा.
Ans: बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्षम केल्यास तुम्हाला UPI PIN टाकण्याची गरज नाही.