Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iPhone: नवीन iPhone लाँच होताच Apple ने बंद केले ‘हे’ तीन मॉडेल्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर

अ‍ॅपलचा सर्वात परवडणारा आयफोन बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन आयफोन लाँच होताच कंपनीने जुने आयफोन बंद केले आहेत. यामध्ये iPhone SE 3 iPhone 14 आणि iPhone 14 Plus यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2025 | 02:54 PM
Apple iPhone: नवीन iPhone लाँच होताच Apple ने बंद केले 'हे' तीन मॉडेल्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर

Apple iPhone: नवीन iPhone लाँच होताच Apple ने बंद केले 'हे' तीन मॉडेल्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

टेकजायंट कंपनी Apple ने नुकताच त्यांचा नवीन आणि स्वस्त आयफोन लाँच केला आहे. हा स्वस्त आयफोन iPhone 16e या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने 19 फेब्रुवारी रोजी बुधवारी हा नवीन आणि स्वस्त आयफोन लाँच केला आहे. पण नवीन आणि स्वस्त आयफोन लाँच होताच कंपनीने तीन जुन्या मॉडेल्सचं प्रोडक्शन बंद केलं आहे. यामध्ये iPhone SE 3, iPhone 14 आणि iPhone 14 Plus यांचा समाावेश आहे.

iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या

पोस्ट शेअर करत दिली माहिती

कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे आणि सांगितलं आहे की कंपनी iPhone SE 3, iPhone 14 आणि iPhone 14 Plus आता अधिकृतपणे बंद करणार आहे. याआधी iPhone SE 3 हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन होता, तर iPhone 14 हा प्रीमियम आणि आधुनिक वैशिष्ट्यांच्या शोधात असलेल्यांसाठी मूल्यवान डिव्हाइस मानला जात होता. मात्र आता कंपनीने अधिकृतपणे अशी घोषणा केली आहे की, ते त्यांचे तीन जुने मॉडेल्स बंद करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Apple has officially discontinued the iPhone SE 3, iPhone 14 and iPhone 14 Plus pic.twitter.com/pJLJu0QPPF

— Apple Hub (@theapplehub) February 19, 2025

तीन आयफोन मॉडेल्स बंद

Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून iPhone SE (तिसरी पिढी), iPhone 14 आणि iPhone 14 Plus काढून टाकण्यात आली आहे. तर यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीने iPhone 15 Pro देखील बंद केला होता. याचा अर्थ असा की आता तुम्ही फक्त iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max, iPhone 16e (28 फेब्रुवारी नंतर), iPhone 15 आणि iPhone 15 Plus हे आयफोन मॉडेल्स Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

iPhone SE 3, iPhone 14 आणि iPhone 14 Plus पूर्णपणे बंद झालेले नाहीत. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून या आयफोन मॉडेल्सची विक्री बंद केली असली तरी देखील हे आयफोन मॉडेल्स अजूनही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असतील. परंतु ते आता अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येणार नाहीत.

‘iPhone 16e’ खरंच बजेट फ्रेंडली आहे? सोशल मिडियावर युजर्सनी घातला धुमाकूळ; ‘हे’ मीम्स तुफान व्हायरल

जरी Apple ने iPhone 16 सिरीज लाँच करताना स्पष्ट केले की ते iPhone 14 आणि iPhone 14 Plus बंद करतील. अशा परिस्थितीत, iPhone SE 3 आणि iPhone 14 बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण ते बाजारात लाइटनिंग पोर्ट असलेले एकमेव आयफोन होते आणि ईयूने आता सर्व उपकरणांमध्ये यूएसबी टाइप-सी अनिवार्य केले आहे. त्यामुळे कंपनीने हे मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

iPhone 16e स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅपलचा सर्वात परवडणारा आयफोन बाजारात लाँच झाला आहे. या डिव्हाइसमध्ये Apple चे स्वतःचे 5G सेल्युलर मॉडेम आहे, ज्याला C1 म्हणतात. याशिवाय, डिव्हाइसमध्ये A18 चिप, 48-मेगापिक्सेल कॅमेरा, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नाईट मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये मॅगसेफ चार्जिंगची सुविधा नाही. भारतात iPhone 16e ची किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते.

Web Title: Apple discontinues iphone se 3 iphone 14 and iphone 14 plus know the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.