Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ChiChi नावाने एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका इंफ्लूएंसरचा एमएमएस असल्याचा दावा केला जात आहे. मात्र खरं तर लोकांची फसणूक करण्यासाठी हे एक जाळं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 11:58 AM
ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन... सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन... सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल पोस्ट आणि लिंक साइबरक्राइम ऑपरेशनचा भाग
  • असा कोणताही व्हिडीओ ऑनलाईन उपलब्ध नाही
  • स्कॅमसाठी सायबर गुन्हेगारांनी एसईओ पॉइजनिंग तंत्रज्ञानाचा वापर केला
सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन पद्धत घेऊन आले आहेत. सध्या लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी एक नवीन पद्धत वापरली जात आहे. जर तुम्हाला एखादी लिंक शेअर करण्यात आली असेल ज्यामध्ये “चिची” चा व्हायरल व्हिडिओ किंवा वेरा हिलचा लीक झालेला व्हिडिओ असल्याचा दावा केला जात असेल तर चुकूनही या लिंकवर क्लिक करू नका. कारण खरं तर या पोस्टमध्ये फिलीपींसच्या इंन्फ्लुएंसरचा एमएमएस स्कँडल असल्याचा दावा केला जात आहे. हे एक साइबरक्राइम ऑपरेशनचा भाग आहे. हा तथाकथित ‘चिची लीक झालेला व्हिडिओ’ हा एक घोस्ट फाइल घोटाळा आहे जो वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा आणि माहिती गोळा करण्यासाठी डिझाइन केलेला आहे

MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वेरा हिल एक पॉपुलर लाइफस्टाइल आणि ट्रॅवल इंफ्लुएंसर आहे आणि फिलीपींसच्या Siargao मधून येते आणि ऑनलाईन जगात तिला ChiChi नावाने ओळखले जाते. आता असा दावा केला जात आहे की, फिलीपींसची ही इंफ्लुएंसर वेरा हिलचा एक वैयक्तिक व्हिडीओ लीक झाला आहे. तथापी, विश्लेषकांचे असं म्हणणं आहे की, असा कोणताही व्हिडीओ ऑनलाईन उपलब्ध नाही. हा ट्रेंड सायबर गुन्हेगारांनी रचलेला एक सापळा आहे. लोकांकडून पैसे उकळण्यासाठी आणि लोकांची फसवणूक करण्यासाठी हा नवीन ट्रेंड सुरु करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

साइबर सिक्योरिटी एनालिस्ट्स आणि फॅक्ट चेक करणाऱ्या तज्ज्ञांचे असं म्हणणे आहे की, जी क्लिप ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे टिकटॉक, फेसबुक, टेलीग्राम आणि रेडिटवर व्हायरल केली जात आहे, तिचा वेरा हिलसोबत कोणताही संबंध नाही. एडीटींग करून एक खोटी लिंक तयार करण्यात आली आहे आणि यामध्ये व्हिडीओ जोडण्यात आला आहे. या व्हिडीओबाबत खोटे दावे करून लोकांची फसवणूक केली जात आहे.

कशी केली जाते लोकांची फसवणूक?

या स्कॅमसाठी सायबर गुन्हेगारांनी एसईओ पॉइजनिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हा घोटाळा एसईओ पॉइजनिंगचा वापर करतो, ज्यामध्ये कीवर्ड्सने परिपूर्ण ब्लॉग पोस्ट आणि सोशल मीडिया अकाउंट्स असतात, ज्यामध्ये “चिची व्हिडिओ फुल” आणि “चिची वेरा हिल व्हायरल लिंक” सारखे शब्द समाविष्ट असतात. जेव्हा एखादा यूजर या लिंकवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्यासमोर एक खोटे स्ट्रीमिंग पेज ओपन होते. यानंतर यूजर्सचा आईपी अ‍ॅड्रेस कॅप्चर केला जाऊ शकतो.

Free Fire MAX: प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी… हे आहेत आजचे रिडीम कोड्स

यूजरला नकली फेसबुक पेज वेरिफिकेशन लॉगिन पेजवर पाठवले जाऊ शकते. यूजरला क्रेडेंशियल फिशिंग पेजवर पाठवले जाऊ शकते. यावेळी यूजरला ब्राउझर प्लगइन इंस्टॉल करण्यास सांगितले जाऊ शकते, जे प्रत्यक्षात मालवेअर आहे. असे मालवेअर कीबोर्डवर टाइप केलेले बटण रेकॉर्ड करू शकतात आणि बँकिंग क्रेडेन्शियल्ससह संवेदनशील माहिती धोक्यात आणू शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

Web Title: Chichi viral video scam one click and your smartphone will hack by hackers know about the scam in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
4

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.