Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स
टेक जायंट कंपनी Apple ने अलीकडेच त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. शिवाय कंपनीने त्यांची ही नवीन आयफोन सिरीज अनेक अपग्रेडसह लाँच केली आहे. या नवीन आयफोन सिरीजनंतर आता कंपनीच्या फोल्डेबल फोनबाबत चर्चा सुरु झाली आहे. कंपनी त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन कधी लाँच करणार, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या फोल्डेबल आयफोनबाबत चर्चा सुरु आहे.
असं सांगितलं जात आहे की, कंपनी लवकरच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच करणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी पुढील वर्षी त्यांची आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजसोबत कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केला जाणार आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने सांगितलं आहे की, Apple चा पहिला फोल्डेबल फोन असा दिसू शकतो जसं की ते कदाचित दोन टायटॅनियम आयफोन एअर्स एकत्र जोडले आहेत. यामुळे Apple ला पातळ, अधिक आकर्षक फोल्डेबल डिझाइन मिळू शकेल. हे डिव्हाइस केवळ सुधारित टिकाऊपणाच नाही तर एक प्रीमियम फील देखील देईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगसह अनेक स्मार्टफोन ब्रँड्सनी त्यांचे फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. मात्र सध्या काही स्मार्टफोन ब्रँड या सेगमेंटमध्ये प्रचंड ताकदवान झाले आहे. अशा परिस्थितीत, Apple चाहत्यांना हे डिव्हाईस दैनंदिन जीवनात कसे कार्य करेल याबद्दल थोडेसे काळजी वाटते. Apple च्या पहिल्या फोल्डेबल डिवाइसमध्ये iPhone Air सारखी टाइटेनियम फ्रेम आणि स्टेनलेस स्टीलचे कॉम्बिनेशन असू शकते. यामुळे फोनला चांगली ताकद मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे.
समोर आलेल्या अहवालानुसार असा अंदाज लावला जाऊ शकतो की, पहिल्या फोल्डेबल आयफोनची किंमत 2,000 डॉलरहून जास्त असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हे डिव्हाईस कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात महाग डिव्हाईस असू शकते. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही. त्यामुळे ही सर्व माहिती केवळ समोर आलेल्या रिपोर्टवरून आणि सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवरून देण्यात आली आहे.
Google Gemini AI: सोशल मीडियावर आला AI फोटोंचा पूर, कशी कराल खऱ्या फोटोंची ओळख? जाणून घ्या
अहवालानुसार असा अंदाज लावला जाऊ शकतो की, पहिल्या फोल्डेबल iPhone मध्ये 5.5 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जर आतील बाजूस 7.8 इंचाची इनर फोल्डेबल स्क्रीन दिली जाऊ शकते. मिंग-ची कुओ म्हणतात की आतील डिस्प्ले क्रीज-फ्री असण्याची शक्यता आहे आणि तो सॅमसंग डिस्प्लेद्वारे समर्थित असू शकतो. फोटोग्राफीसाठी, फोल्डेबल डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सिंगल फ्रंट कॅमेरा असू शकतो.