BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही
तुम्ही देखील बीएसएनएल युजर आहात का? तुम्ही देखील बीएसएनएलच्या अशा देखील रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहात का, ज्याची किंमत कमी आणि फायदे जास्त असतील? तर सरकारी टेलीकॉम कंपनी तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. तुम्ही बीएसएनएल फाइबर कनेक्शनचा वापर करत असाल ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. तुम्हाला क्रिकेट बघायला आवडतं किंवा तुम्हाला वेब सिरीज आवडत असतील तर कंपनीने लाँच केलेला हा नवीन प्लॅन तुम्ही नक्की बघा.
सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या युजर्ससाठी एक आकर्षक ऑफर घेऊन आली आहे. ही ऑफर विशेषत: अशा लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे, ज्यांना क्रिकेट बघायला आवडतं किंवा वेब सिरीज पहायला आवडतात. कंपनी त्यांच्या युजर्ससाठी खास ओटीटी प्लॅन घेऊन आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी खास BiTV अॅपचा एक विशेष प्लॅन घेऊन आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनची किंमत केवळ 151 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 25 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन आणि 400 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा फ्री अॅक्सेस ऑफर केला जात आहे. बीएसएनएल चे BiTV अॅप काय आहे, याबाबत सर्वात आधी जाणून घेऊया.
खरं तर या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने BiTV अॅप लाँच केला होता, जो सुरुवातीला केवळ चाचणी टप्प्यात होता. त्यावेळी हा अॅप युजर्ससाठी मोफत उपलब्ध होता. आता कंपनीने हा अॅप अधिकृतपणे लाँच केला आहे. या अॅपमध्ये युजर्सना ZEE5, SonyLIV, Aha, Shemaroo, Lionsgate, Sun Nxt, Chaupal, Discovery, Epic ON, ETV Win सारख्या प्रमुख OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहण्याची सुविधा आहे.
कंपनीने या अॅपचा एक विशेष प्लॅन आता लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 151 रुपये आहे. यामध्ये 30 दिवसांसाठी क्रिकेट टूर्नामेंट्स, वेब सीरीज, चित्रपट आणि लाइव चॅनल्सची मजा घेऊ शकता. सिंगल रिचार्जमध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्याचे एंटरटेनमेंट मिळणार आहे. या योजनेसह, तुम्ही आज भारत आणि पाकिस्तानमधील दुसरा सुपर-4 सामना सोनीलिव्ह अॅपद्वारे देखील पाहू शकता.
तुम्हाला देखील BiTV अॅपवर वेब सिरीज आणि चित्रपट पाहायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला fms.bsnl.in/iptvreg या लिंकवर क्लिक करावं लागणार आहे. यानंतर, रजिस्टर वर क्लिक करा आणि BSNL मोबाईल किंवा BSNL फायबर निवडा. यानंतर, तुमचा मोबाईल नंबर आणि सर्कल निवडा. हे केल्यानंतर, तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. आता ओटीपी वेरिफाईड करा. BiTV अॅप वापरून प्लॅन निवडा, तुमचे पेमेंट पूर्ण करा आणि तुमच्या फोन, टीव्ही किंवा लॅपटॉपवर कंटेंटचा आनंद घ्या. कृपया लक्षात ठेवा की BiTV अॅप फक्त BSNL सिम किंवा BSNL फायबर कनेक्शन असलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.