Apple iPhone 16e: काय सांगता! नवीन आयफोन तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, या दिवशी सुरु होणार विक्री
टेक जायंट कंपनी अॅपलचा नवीन आणि स्वस्त आयफोन Apple iPhone 16e काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला आहे. 28 फेब्रुवारीपासून या लेटेस्ट आयफोनची विक्री सुरु होणार आहे. हा स्वस्त आयफोन 59,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. आयफोन प्री बुकींगसाठी उपलब्ध झाला असून या आयफोनच्या खरेदीवर तुम्हाला फ्लॅट 10 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. नवीन आयफोन तुम्हाला 49,900 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Apple चा परवडणारा आयफोन 59,900 रुपयांच्या किंमतीत भारतात लाँच करण्यात आला आहे. या आयफोन मॉडेलसाठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून त्याची विक्री 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. फर्स्ट सेलमध्ये आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आहे. तुम्हाला आयफोनच्या खरेदीवर तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. लेटेस्ट iPhone 16e ची विक्री सुरु होण्यापूर्वीच अॅपलच्या ऑफिशियल डिस्ट्रीब्यूटरने पहिल्या सेल ऑफरचे डिटेल्स शेअर केले आहेत. या ऑफरसह, iPhone 16e 10 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करता येईल. (फोटो सौजन्य – Apple)
Apple iPhone 16e स्मार्टफोनवर बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस दिले जातील. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. या कॅशबॅकनंतर, फोनची किंमत 55,900 पयांपर्यंत कमी होते. यासोबतच, जुना फोन एक्सचेंज केल्यावर 6000 रुपयांची सूट मिळेल. यानंतर लेटेस्ट आयफोनची किंमत 49,900 रुपयांपर्यंत कमी होईल. एक्सचेंज डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असतो. त्यामुळे या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर तुम्हाला नवीन आयफोन 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Apple iPhone 16e स्मार्टफोनची विक्री 28 फेब्रुवारीपासून भारतातील सर्व स्टोअरमध्ये सुरू होईल. हे मॉडेल तीन व्हेरिअंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. Apple iPhone 16e च्या 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,900 रुपये, 256GB स्टोरेज स्टोरेज व्हेरिअंटची 69,900 रुपये आणि 512GB स्टोरेज स्टोरेज व्हेरिअंटची 89,900 रुपये आहे.
Apple iPhone 16e स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. यासोबतच कंपनीने त्यात फेस आयडी सिस्टम दिली आहे. यासोबतच, कंपनीने म्यूट बटणाच्या जागी अॅक्शन बटण आणले आहे. कंपनीने या आयफोनमध्ये USB-C पोर्ट दिला आहे. या परवडणाऱ्या आयफोन मॉडेलमध्ये नवीनतम A18 चिप आहे.
अॅपलने त्यांच्या रॅमची माहिती शेअर केलेली नाही. तथापि, बेंचमार्क चाचण्यांवरून असे दिसून येते की यात 8 जीबी रॅम असू शकते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 16e मध्ये 48MP फ्यूजन रियर कॅमेरा आहे, जो 2x डिजिटल झूम, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड आणि HDR ला सपोर्ट करतो. यासोबतच, समोर 12 एमपीचा ट्रूडेपथ कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. हे मॉडेल 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करते.