Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा
23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 ला सुरुवात झाली आहे. यावेळी सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड घसरल्या आहेत. महागड्या आणि प्रिमियम स्मार्टफोनवर सेलमध्ये मोठं डिस्काऊंट देण्यात आले आहे. ज्यामुळे महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन सेलमध्ये अगदी कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
आता आम्ही तुम्हाला नथिंग स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, सेलमध्ये ज्याची किंमत प्रचंड कमी झाली आहे. बिग बिलीयन डेज सेलदरम्यान Nothing Phone 3a हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Nothing Phone 3a अशा लोकांसाठी खास आहे, ज्यांना सामान्य स्मार्टफोन वापरायचा नाही. त्याची अनोखी रचना आणि स्वच्छ सॉफ्टवेअर अनुभव यामुळे ते स्मार्टफोनच्या गर्दीतून वेगळे दिसते.खरं तर नथिंग स्मार्टफोन त्यांच्या डिझाईनसाठी ओळखळे जातात. इतर स्मार्टफोन्सचा विचार केला तर या सर्व स्मार्टफोनपेक्षा नथिंग स्मार्टफोनची डिझाईन बरीच वेगळी आहे. त्यामुळे लोकं नथिंग स्मार्टफोन्सना प्राधान्य देतात. नथिंग स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिलबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Nothing Phone 3a भारतात 24,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र सध्या बिग बिलीयन डेज सेलदरम्यान हा स्मार्टफोन 23,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांचे एडिशनल डिस्काउंट देखील ऑफर केलं जाणार आहे. यामुळे या स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपयांपर्यंत कमी होते. तसेच जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर या स्मार्टफोनची किंमत 19,250 रुपयांपर्यंत कमी होते. त्यामुळे सेलमध्ये हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Nothing Phone 3a मध्ये 6.77-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जे 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 3000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी, Nothing Phone 3a मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 50MP चा टेलीफोटो सेंसर शामिल यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Nothing Phone 3a मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.