Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!

भारत आयफोनच्या निर्मितीमध्ये पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत आहे. कंपनी भारतात Apple iPhone च्या एन्क्लोजरच्या निर्मितीसाठी वेगवेगळे प्लँच उभारत आहे. याबाबत आपण आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2025 | 07:45 PM
भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!

भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!

Follow Us
Close
Follow Us:

भारतात आता Apple ची उपस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. भारत लवकरच Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जाणार आहे. यासाठी कंपनीने तयारी देखील सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती की बंगळुरुमध्ये Apple चं एक नवीन युनिट तयार केलं जात आहे. यासाठी कंपनीने तयारी देखील सुरु केली आहे. या युनिटसोबतच आता कंपनी भारतात एक नवीन प्लँट देखील सुरु करणार आहे. हा नवीन प्लँट तमिळनाडूमध्ये सुरु केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनी भारतातील आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहे.

Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स

Foxconn ने भारतात उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला

Apple चे मुख्य मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर Foxconn ने भारतात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तैवानी कंपनी भारतात iPhone चे एन्क्लोजर म्हणजेच बाह्य रचना किंवा बॉडी केसचे उत्पादन सुरू करणार आहे, असं सांगितलं जात आहे. सध्या भारतात केवळ Tata Electronics च iPhone चे एन्क्लोजर तयार करत आहे. Foxconn चा मुख्य फोकस पूर्णपणे iPhone च्या असेंबलीवर होता. मात्र आता फॉक्सकॉन देखील एन्क्लोजर तयार करण्यास सुरुवात करणार आहे. ज्यामुळे आता Apple भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. यासाठी वेगाने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारतातील या ठिकाणी तयार होणार नवा प्लँट

मिळालेल्या माहितीनुसार, Foxconn ने तमिळनाडुच्या Oragadam स्थित ESR Industrial Park मध्ये एक नवीन युनिट बनवण्याचं काम सुरु केलं आहे. या प्लँटमध्ये iPhone चे एन्क्लोजर (बॉडी) तयार केले जाणार आहेत. हा प्लँट फॉक्सकॉनच्या बांधकामाधीन असलेल्या दुसऱ्या प्लँटजवळ असेल, ज्यामध्ये आयफोन डिस्प्ले मॉड्यूल बनवले जातील. Foxconn सध्या श्रीपेरंबुदुरमध्ये iPhone ची असेंबली करते. मात्र एन्क्लोजर तयार करण्याच्या योजनेमुळे आता Foxconn त्यांची स्थानिक उत्पादन क्षमता वाढवणार आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की Foxconn ने घेतलेला हा निर्णयामुळे Apple च्या धोरणाचा एक भाग आहे. यामध्ये चीनप्रमाणेच भारतात वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पुरवठादार तयार करू इच्छिते.

Tech Tips: स्मार्टफोनची ही हिडन सेटिंग यूजर्ससाठी ठरणार वरदान, लॉक स्क्रीन नोटिफिकेशनसह आणखी काय खास?

भारताच्या अन्य शहरांमध्ये ही सुरु झाला विस्तार

Foxconn ने तमिळनाडुशिवाय बंगळुरुजवळील देवनहल्ली येथे एक मोठे युनिट तयार केले आहे. येथून iPhone ची शिपिंग जून 2025 पासून सुरु केली जाण्याची शक्यता आहे. तसेच हैदराबादमध्ये Foxconn एअरपॉड्सच्या असेंब्लीसाठी एक नवीन प्लँट सुरु करण्याची योजना आखत आहे.

Web Title: Apple is planning to start iphone enclosures in india soon india will be become the apple manufacturing hub tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.