
WhatsApp मध्ये होणार मोठे बदल! ना Google Drive ची गरज, ना फोटो क्वालिटीची चिंता... यूजर्सचा अनुभव बदलणार
टेक्स्ट मेसेजसाठी देखील आता व्ह्यु वन्स फीचर जारी केलं जाणार आहे. आतापर्यंत ही सुविधा केवळ फोटो, व्हिडीओ आणि व्हॉईस मेसेजसाठी उपलब्ध होती. मात्र आता हे फीचर टेक्स्ट मेसेजसाठी देखील रिलीज केलं जाणार आहे. नव्या पर्यायामध्ये सेंडर एकदाच पाहिले जाणारे मेसेज देखील पाठवू शकतात. रिसीव्हरला वाचण्यासाठी या मेसेजवर टॅप करावे लागणार आहे. यानंतर मेसेज एका वेगळ्या स्क्रीनमध्ये दिसेल आणि हा मेसेज वाचून झाल्यानंतर जेव्हा बंद केला जाईल, तेव्हा चॅटमधून देखील हा मेसेज गायब होणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
सध्या चॅट बॅकअपसाठी अँड्रॉईडमध्ये गूगल ड्राईव्ह आणि आयफोनमध्ये आयक्लाऊडची सुविधा मिळते. मात्र आता यूजर्सना चॅट बॅकअपसाठी व्हॉट्सॲप क्लाऊड स्टोरेजचा पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना 2 GB पर्यंत फ्री स्टोरेज ऑफर केले जाणार आहे. हे बॅकअप पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे.
व्हॉट्सॲप अँड्रॉईड ॲपच्या खालील बाजूला दिसणाऱ्या नेव्हिगेशन बारच्या डिझाईनमध्ये देखील बदल केला जाणार आहे. नवीन नेव्हिगेशन बार यूजर्सना स्क्रीनच्या कडांपासून वेगळी, तरंगणारी पट्टी (फ्लोटिंग स्ट्रिप) म्हणून दिसेल. यामध्ये ‘चॅट’, ‘अपडेट’, ‘कॉन्टॅक्ट’ आणि ‘कॉल’ यांसारखे पर्याय असतील.
फोटो एडिटिंगमध्ये एक AI-बेस्ड फोटो एक्सपांशन टूल जोडण्याची तयारी देखील सुरु आहे. या टूलच्या मदतीने यूजर्स फोटोच्या कडांचा विस्तार करू शकतील. एआय फोटोच्या आजूबाजूचा भाग स्वत: क्रिएट करू शकणार आहे, ज्यामुळे फोटोची फ्रेम मोठी केली जाऊ शकते. सध्या हे फीचर काही निवडक यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
ना फोन, ना ईअरबड्स! Nothing चा नवा प्रयोग… स्क्रीनशिवाय येणार रहस्यमयी AI डिव्हाईस; लाँच तारीख जाहीर
सध्या व्हॉट्सॲपवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना स्टँडर्ड आणि एचडी क्वालिटी असे पर्याय मिळतात. मात्र आता कंपनी ओरिजीनल क्वालिटी पर्याय देखील उपलब्ध करणार आहे. यामुळे फोटो आणि व्हिडीओ कंप्रेस न करता पाठवण्याची सुविधा मिळणार आहे आणि यामुळे त्यांची ओरिजिनल क्वालिटी देखील खराब होणार नाही.
Ans: WhatsApp मध्ये View Once टेक्स्ट मेसेज, 2GB फ्री क्लाउड स्टोरेज, नवीन फ्लोटिंग नेव्हिगेशन बार, AI फोटो एक्सपांशन टूल आणि ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटो-व्हिडीओ पाठवण्याचे फीचर्स येणार आहेत.
Ans: या फीचरमध्ये पाठवलेला टेक्स्ट मेसेज रिसीव्हरला एकदाच पाहता येईल. मेसेज उघडून वाचल्यानंतर स्क्रीन बंद केल्यास तो चॅटमधून गायब होईल.
Ans: WhatsApp च्या नवीन क्लाउड बॅकअप सुविधेमध्ये यूजर्सना 2GB पर्यंत फ्री स्टोरेज मिळणार आहे. हे बॅकअप एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल.